पटना पक्षी अभयारण्य आणि छरी-धांड येथे नवीन रामसर स्थळांचे पंतप्रधानांनी केले स्वागत

January 31st, 10:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एटा (उत्तर प्रदेश) येथील पटना पक्षी अभयारण्य आणि कच्छ (गुजरात) येथील छारी-धंद यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाल्याचे स्वागत केले आहे. स्थानिक लोकसंख्या आणि पाणथळ जागांच्या संवर्धनाबद्दल आस्था असलेल्या सर्वांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले की, या मान्यतांमुळे जैवविविधतेचे संरक्षण आणि महत्त्वपूर्ण परिसंस्थांचे जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी होते.

The fact sheet on India's growth is a success story of the Reform-Perform-Transform mantra: PM Modi in Rajkot

January 11th, 02:45 pm

PM Modi inaugurated the Vibrant Gujarat Regional Conference for the Kutch and Saurashtra region in Rajkot. Recalling the devastating earthquake in Kutch and drought in Saurashtra, the PM said these regions are now emerging as major drivers of Aatmanirbhar Bharat and India’s rise as a global manufacturing hub. He highlighted the achievements India has made over the past 11 years.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटमध्ये कच्छ आणि सौराष्ट्र विभागांसाठी व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेचे केले उद्घाटन

January 11th, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या राजकोट येथे कच्छ आणि सौराष्ट्र क्षेत्रासाठी व्हायब्रंट गुजरात या प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी नमूद केले की, 2026 वर्षाच्या सुरुवातीनंतरचा त्यांचा हा गुजरातचा पहिलाच दौरा आहे. त्यांनी अधोरेखित केले की, आज सकाळीच त्यांनी भगवान सोमनाथांचे दिव्य दर्शन घेतले आणि आता ते राजकोटमधील या भव्य कार्यक्रमात सहभागी होत आहेत. विकास भी, विरासत भी हा मंत्र सर्वत्र घुमत आहे, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान 11 जानेवारी रोजी राजकोटला भेट देणार

January 09th, 12:07 pm

पंतप्रधान 11 जानेवारी 2026 रोजी राजकोटला भेट देतील आणि कच्छ व सौराष्ट्र प्रदेशासाठी आयोजित व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत सहभागी होतील. दुपारी सुमारे 1:30 वाजता ते परिषदेतील व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी सुमारे 2 वाजता पंतप्रधान राजकोट येथील मारवाडी विद्यापीठात कच्छ आणि सौराष्ट्र प्रदेशासाठीच्या व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 14 ग्रीनफिल्ड स्मार्ट गुजरात औद्योगिक विकास महामंडळ लिमिटेड (जीआयडीसी) वसाहतींच्या विकासाची घोषणा करतील आणि राजकोट येथील जीआयडीसीच्या वैद्यकीय उपकरण पार्कचे उद्घाटन करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 जानेवारी दरम्यान गुजरात दौऱ्यावर

January 09th, 12:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 जानेवारी दरम्यान गुजरातला भेट देणार आहेत. सोमनाथ येथे पंतप्रधानांचे 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास आगमन होईल. पंतप्रधान सोमनाथ मंदिरात आयोजित ओंकार मंत्रपठण कार्यक्रमात सहभागी होतील आणि त्यानंतर सोमनाथ मंदिरातील ड्रोन शो बघतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (127 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

October 26th, 11:30 am

अशा कठीण काळात सुमारे वीस वर्षांचा एक युवक या अन्यायाविरुद्ध उभा राहिला. आज मी या तरुणाबद्दल एका खास कारणासाठी चर्चा करत आहे. त्याचे नाव उघड करण्यापूर्वी मी तुम्हाला त्याच्या शौर्याबद्दल सांगेन. मित्रांनो, त्या काळात जेव्हा निजामाविरुद्ध एकही शब्द बोलणे गुन्हा मानले जात असे, तेव्हा या तरुणाने सिद्दीकी नावाच्या निजामाच्या अधिकाऱ्याला उघडपणे आव्हान दिले. निजामाने सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचं पीक जप्त करण्यासाठी पाठवलं होते. परंतु अत्याचाराविरुद्धच्या या संघर्षात त्या तरुणानं सिद्दीकीची हत्या केली. तो अटकेपासून स्वतः ला वाचवण्यातही यशस्वी झाला. निजामाच्या जुलमी पोलिसांपासून सुटका करून घेऊन तो तरुण शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या आसाममध्ये पोहोचला.

An RSS shakha is a ground of inspiration, where the journey from 'me' to 'we' begins: PM Modi

October 01st, 10:45 am

In his address at the centenary celebrations of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), PM Modi extended his best wishes to the countless swayamsevaks dedicated to the resolve of national service. He announced that, to commemorate the occasion, the GoI has released a special postage stamp and a coin. Highlighting the RSS’ five transformative resolutions, the PM remarked that in times of calamity, swayamsevaks are among the first responders.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित केले

October 01st, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी सर्व नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या, आणि आज महानवमी आणि देवी सिद्धिदात्रीचा दिवस असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, उद्या विजयादशमीचा भव्य उत्सव आहे. हा दिवस, अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि अधःकारावर प्रकाशाचा विजय, हे भारतीय संस्कृतीचे कालातीत सत्य अधोरेखित करतो.

कर्नाटक, तेलंगण, बिहार आणि आसाम या राज्यांना लाभदायक असलेल्या तीन प्रकल्पांच्या बहु-मार्गीकरणाला तसेच गुजरातमधील कच्छच्या दुर्गम भागांना जोडणाऱ्या एका नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता

August 27th, 04:50 pm

हे प्रकल्प प्रवासी आणि मालवाहतूक सुलभ आणि जलद करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या उपक्रमांमुळे संपर्क व्यवस्था वाढेल आणि प्रवास अधिक सोयीचा होईल, शिवाय लॉजिस्टिक खर्च कमी होईल आणि तेल आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. याव्यतिरिक्त, हे प्रकल्प कार्बन उत्सर्जन कमी करण्यास हातभार लावतील, ज्यामुळे शाश्वत आणि कार्यक्षम रेल्वे वाहतुकीस चालना मिळेल. या प्रकल्पांमुळे बांधकामाच्या कालावधीत सुमारे 251 लाख मानवी दिवसांसाठी थेट रोजगार निर्माण होईल.

पंतप्रधानांनी कच्छच्या सौंदर्याचे वर्णन करण्याच्या आणि दुचाकीस्वारांना त्या भागात भेट देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचे गौरव केले

July 20th, 08:59 am

टीव्हीएस मोटर कंपनीचे श्री वेणु श्रीनिवासन आणि श्री सुदर्शन वेणु यांनी काल नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी कच्छच्या सौंदर्याचे वर्णन करण्याच्या आणि दुचाकीस्वारांना त्या भागात भेट देण्यासाठी प्रेरित करण्याच्या त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले.

गुजरातमधील भूज येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 26th, 05:00 pm

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनोहर लाल जी, मंत्रिमंडळातील इतर सर्व सदस्य, खासदार, आमदार, इतर सर्व वरिष्ठ मान्यवर आणि कच्छमधील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील भूज येथे 53,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

May 26th, 04:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील भूज येथे 53,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी कच्छच्या लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि क्रांतिकारक आणि शहीदांना, विशेषतः महान स्वातंत्र्यसैनिक श्री श्यामजी कृष्ण वर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी कच्छचे सुपुत्र आणि कन्या यांच्या लवचिकतेची आणि योगदानाची दखल घेत त्यांना अभिवादन केले.

भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.

January 14th, 10:45 am

केंद्रीय मंत्री मंडळातील माझे सोबती डॉ. जितेंद्र सिंह जी, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासचिव प्रोफेसर सेलेस्ते साउलो जी, परदेशातून आलेले आपले विशेष अतिथी गण, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन जी, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा जी, इतर महानुभाव, सर्व वैज्ञानिक आणि विविध विभाग तसेच संस्थांचे अधिकारी, बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभाला केले संबोधित

January 14th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभाग घेतला.

रण महोत्सवात प्राचीन पांढऱ्या शुभ्र रणचा अनुभव घेण्याचे, कच्छच्या नेत्रदीपक संस्कृती आणि सौहार्दपूर्ण आदरातिथ्याचा अनुभव घेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांना आवाहन

December 21st, 10:08 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे मार्च 2025 पर्यंत चालणाऱ्या रण महोत्सवासाठी सर्वांना आमंत्रित केले आहे. हा महोत्सव एक अविस्मरणीय असेल ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे.

Our Jawans have proved their mettle on every challenging occasion: PM Modi in Kutch

October 31st, 07:05 pm

PM Modi celebrated Diwali with the personnel of the BSF, Army, Navy and Air Force near the Indo-Pak border, at Lakki Nala in Sir Creek area in Gujarat's Kutch. The Prime Minister conveyed his deep appreciation for the soldiers' service to the nation, acknowledging the sacrifices they make in challenging environments.

PM Modi celebrates Diwali with security personnel in Kutch,Gujarat

October 31st, 07:00 pm

PM Modi celebrated Diwali with the personnel of the BSF, Army, Navy and Air Force near the Indo-Pak border, at Lakki Nala in Sir Creek area in Gujarat's Kutch. The Prime Minister conveyed his deep appreciation for the soldiers' service to the nation, acknowledging the sacrifices they make in challenging environments.

सरकारचे प्रमुख या नात्याने 23 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली

October 07th, 09:06 pm

सरकारचे प्रमुख या नात्याने 23 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळाचे त्यांनी स्मरण केले आणि ते म्हणाले की त्या काळात समाजाचे सर्व घटक समृद्ध होतील याची सुनिश्चिती करत गुजरात राज्य ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेचे झळाळते उदाहरण म्हणून उदयाला आले. गेल्या दशकातील देशाच्या प्रगतीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की भारताच्या विकासात्मक प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर आपल्या देशाकडे अतिशय आशेने पाहिले जाईल याची सुनिश्चिती झाली आहे. आपण देशहितासाठी अथकपणे काम करत राहणार असून विकसित भारताचे सामुहिक उद्दिष्ट साध्य होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली.

प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीत स्मृतीवनला स्थान मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला

June 15th, 06:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कच्छ मधील शांतीवनाच्या प्रिक्स व्हर्साय म्युझियम्स 2024 च्या जागतिक निवड यादीतील समावेशाचे स्वागत केले आहे. 2001 साली कच्छ येथील विनाशकारी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

Congress's mindset is against the rural development of border villages: PM Modi in Barmer

April 12th, 02:30 pm

Ahead of the upcoming Lok Sabha elections, PM Modi was accorded a bustling welcome by Barmer as he addressed an election rally in Rajasthan. He said, Rajasthan represents valour and courage along with a resolve to enable a 'Viksit Bharat.' He added that looking at the popular support, the people are determined for '4 June 400 Paar, Fir ek Baar Modi Sarkar.'