आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील आग दुर्घटनेतील मृतांबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

October 24th, 09:02 am

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशाला दिलेल्या भेटीची काही क्षणचित्रे केली सामायिक

October 16th, 09:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशाला दिलेल्या भेटीची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत. श्रीशैलम इथे, पंतप्रधानांनी श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी वारला देवस्थानामध्ये प्रार्थना केली तसेच, श्री शिवाजी ध्यान मंदिर आणि श्री शिवाजी दरबार हॉलला भेट दिली. त्यानंतर, त्यांनी कर्नूल इथे सुमारे 13,430 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही केले.

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 16th, 03:00 pm

आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर, आंध्र प्रदेशचे लोकप्रिय आणि कष्टाळू मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू, चंद्रशेखर पेम्मसानी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, राज्य सरकारमधील मंत्री नारा लोकेश, इतर सर्व मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पीव्हीएन माधव, सर्व खासदार, आमदार, आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो,

आंध्र प्रदेशात कुर्नुल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13,430 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी,उद्घाटन आणि लोकार्पण

October 16th, 02:30 pm

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी अहोबिलमचे भगवान नरसिंह स्वामी आणि महानंदीच्या श्री महानंदीश्वर स्वामी यांना वंदन केले. यावेळी त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी मंत्रालयम् चे गुरु श्री राघवेंद्र स्वामी यांचे आशीर्वाद देखील घेतले.

पंतप्रधान 16 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशला भेट देणार

October 14th, 05:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी 11:15 च्या सुमारास, ते नंद्याल जिल्ह्यातील श्रीशैलम स्थित श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम येथे पूजा करून दर्शन घेतील. त्यानंतर, दुपारी 12:15 वाजता ते श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट देतील.