कोटा श्रीनिवास राव गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
July 13th, 03:55 pm
कोटा श्रीनिवास राव गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. कोटा श्रीनिवास राव गारू यांची चित्रपटविषयक प्रतिभा आणि अष्टपैलुत्व या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ते स्मरणात राहतील असे मोदी यांनी म्हटले आहे. शानदार अभिनयाने त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सामाजिक सेवेतही ते आघाडीवर होते आणि गरीब तसेच वंचितांना सक्षम करण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले, असे मोदी पुढे म्हणाले.