पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहिम ली जे-म्युंग यांची G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट

June 18th, 03:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस येथे 51 व्या जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोरिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांची भेट घेतली. भारत आणि कोरियन प्रजासत्ताक वाणिज्य, गुंतवणूक, तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, जहाजबांधणी आणि इतर क्षेत्रात एकत्र काम करण्याचा प्रयत्नशील राहतील, असे पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले.

पंतप्रधानांनी श्री ली जे-म्युंग यांचे कोरिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन

June 04th, 08:38 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री ली जे-म्युंग यांचे कोरिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी भारत आणि कोरिया प्रजासत्ताक यांच्यातील राजनैतिक संबंधांची पन्नास वर्षे केली साजरी

December 10th, 12:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरिया प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना भारत आणि कोरिया प्रजासत्ताक मधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी परस्पर आदरभाव, सामायिक मूल्य आणि वाढत्या भागीदारीचा आजवरचा प्रवास अधोरेखित करताना आपण यून सुक येओल यांच्या निकट सहवासात या दोन देशांमध्ये विशेष धोरणात्मक भागीदारी सखोल आणि विस्तारित करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.