पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोनेरू हम्पीचे केले अभिनंदन
December 29th, 03:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहा येथे झालेल्या फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये महिला गटात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक जिंकल्याबद्दल कोनेरू हम्पी यांचे अभिनंदन केले आहे. खेळाप्रती त्यांची निष्ठा प्रशंसनीय आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्या देशमुखचे ग्रँडमास्टर झाल्याबद्दल अभिनंदन केले.
July 29th, 06:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्या देशमुख हिचे 2025 फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकण्याबरोबरच ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तिची हि कामगिरी अनेकजणांना प्रेरणा देईल आणि युवावर्गामध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी लोकप्रियता आणखी वाढेल. असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावणाऱ्या दिव्या देशमुखचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
July 28th, 06:29 pm
फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावल्याबद्दल दिव्या देशमुख हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. “कोनेरू हम्पी हिनेही संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा”, असे मोदी यांनी म्हटले आहे.विश्वविजेती बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने पंतप्रधानांची भेट घेतली
January 03rd, 08:42 pm
पोस्ट केलेले: 03 जानेवारी 2025 8:42PM PIB दिल्ली द्वारे विश्वविजेती बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताची मान गौरवाने उंचावल्याबद्दल कोनेरू हंपी हिचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी तिची कुशाग्र बुद्धी आणि अविचल निश्चय स्पष्टपणे दिसून येत होते असे नमूद केले .