पश्चिम बंगालमधील सिंगूर येथील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 18th, 03:30 pm
काल मी मालदामध्ये होतो आणि आज इथे हुगळीमध्ये तुमच्याशी संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले आहे. विकसित भारतासाठी पूर्व भारताचा विकास हे उद्दीष्ट ठेवून केंद्र सरकार सातत्यान काम करत आहे. कालचा आणि आजचा कार्यक्रम हाच निर्धार बळकट करणारे आहेत. या दोन दिवसांत पश्चिम बंगालमधील करोडो रुपयांच्या प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. देशातली पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे काल पश्चिम बंगालमधून सुरू झाली. बंगालमध्ये जवळपास अर्धा डझन नवीन अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या आहेत आणि आज आणखी तीन अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या. यातील एका रेल्वेमुळे काशी वाराणसी या माझ्या मतदारसंघाची पश्चिम बंगालसोबतची संपर्कव्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. शिवाय, दिल्ली आणि तमिळनाडूमध्ये जाणाऱ्या अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील रेल्वे वाहतुकीसाठी हे दोन दिवस अभूतपूर्व असेच म्हणावे लागतील. गेल्या 100 वर्षांत 24 तासांत इतके काम कदाचित कधीच झाले नसेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे ₹830 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि पहिल्या शयनयान वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ
January 18th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे ₹830 कोटींहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. याप्रसंगी जनसभेला संबोधित करताना मोदी यांनी नमूद केले की, काल ते मालदामध्ये होते आणि आज त्यांना हुगळीतील लोकांमध्ये उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. त्यांनी अधोरेखित केले की विकसित भारतासाठी पूर्व भारताचा विकास आवश्यक आहे आणि या ध्येयाने केंद्र सरकार सातत्याने काम करत आहे. काल आणि आजचे कार्यक्रम या संकल्पाला बळ देतात, असे त्यांनी सांगितले. या काळात पश्चिम बंगालच्या विकासाशी संबंधित शेकडो कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
May 23rd, 11:00 am
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मजुमदार जी, मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला जी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा जी, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो जी, मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा जी, सर्व उद्योगपती, गुंतवणूकदार, बंधु आणि भगिनींनो…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन
May 23rd, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करताना, पंतप्रधानांनी ईशान्य प्रदेशाच्या भविष्याप्रति अभिमान, कळकळ आणि प्रचंड विश्वास व्यक्त केला. भारत मंडपम येथे अलिकडेच झालेल्या अष्टलक्ष्मी महोत्सवाची त्यांनी आठवण करून दिली आणि आजचा कार्यक्रम ईशान्य प्रदेशातील गुंतवणुकीचा उत्सव आहे यावर भर दिला. शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या उद्योग धुरिणांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. यातून या प्रदेशातील संधींबाबतचा उत्साह अधोरेखित झाला आहे असे ते म्हणाले. त्यांनी सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांचे अभिनंदन केले तसेच गुंतवणूक-पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी नॉर्थ ईस्ट रायझिंग शिखर परिषदेचे कौतुक केले आणि या प्रदेशाच्या निरंतर विकास आणि समृद्धीप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दिडशेव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित समारंभाला उद्देशून पंतप्रधानांचे संबोधन
January 12th, 11:18 am
मित्रहो, आताच काही वेळापूर्वी या क्षणाची साक्ष देणाऱ्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर या ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांच्या, तसेच येथे काम केलेल्या हजारो माजी कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीवेतनासाठी पाचशे कोटी रुपयांचा धनादेशही सोपविण्यात आला. विशेष म्हणजे शंभर वर्षापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांना सन्मानित करण्याचे भाग्यही मला लाभले. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून राष्ट्र सेवा करणाऱ्या अशा सर्व महान व्यक्तींना आणि त्यांच्या परिवारांना मी अभिवादन करतो, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी अभिष्टचिंतन करतो.कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापनदिन समारंभाला पंतप्रधान उपस्थित, कोलकाता बंदरासाठी बहुविध विकास प्रकल्पांचा केला शुभारंभ
January 12th, 11:17 am
देशाच्या जलशक्तीचे ऐतिहासिक प्रतीक असलेल्या कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापनदिन समारंभात सहभागी होणे हे आपले सौभाग्य असल्याचे मोदी म्हणाले.