For the benefits of central schemes to reach Bengal, a BJP government is essential: PM Modi in Kolkata
August 22nd, 06:00 pm
PM Modi addressed an overflowing crowd gathered at a public meeting in Kolkata where he declared that Bengal’s rise is essential for India’s rise. He firmly reassured, “The BJP government at the Centre has continuously supported Bengal’s growth. From highways to railways, Bengal has received three times more funds than under UPA. But the biggest challenge is that funds sent from Delhi are looted by the state government and not spent on people’s welfare. Instead, they are siphoned off to TMC cadres,” he said.PM Modi’s Kolkata rally: Call for a Viksit Bangla, real ‘poriborton’ and end of TMC’s misrule!
August 22nd, 05:57 pm
PM Modi addressed an overflowing crowd gathered at a public meeting in Kolkata where he declared that Bengal’s rise is essential for India’s rise. He firmly reassured, “The BJP government at the Centre has continuously supported Bengal’s growth. From highways to railways, Bengal has received three times more funds than under UPA. But the biggest challenge is that funds sent from Delhi are looted by the state government and not spent on people’s welfare. Instead, they are siphoned off to TMC cadres,” he said.पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 22nd, 05:15 pm
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी शांतनु ठाकुर जी, रवनीत सिंह जी, सुकांता मुजुमदार जी, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते शुवेंदु अधिकारी जी, संसदेतील माझे सोबती शौमिक भट्टाचार्य जी, उपस्थित अन्य लोकप्रतिनिधी गण, बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 5,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
August 22nd, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 5,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, पश्चिम बंगालच्या विकासाला गती देण्याची संधी त्यांना पुन्हा एकदा मिळाली आहे. नोआपारा ते जय हिंद विमानतळ या कोलकाता मेट्रो प्रवासाचा अनुभव सामायिक करताना मोदी म्हणाले की, या प्रवासात त्यांनी अनेक सहकाऱ्यांशी संवाद साधला आणि कोलकात्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी सहा पदरी उन्नत कोना एक्सप्रेसवेची पायाभरणी देखील केली. या हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी त्यांनी कोलकात्याच्या जनतेचे आणि पश्चिम बंगालच्या सर्व नागरिकांचे हार्दिक अभिनंदन केले.पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापुर येथे विविध विकास प्रकल्पांची सुरुवात करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 18th, 02:35 pm
आपले हे दुर्गापुर, पोलादी शहर असण्यासोबतच भारताच्या श्रमिक शक्तीचे देखील मोठे केंद्र आहे. भारताच्या विकासात दुर्गापुरने फार मोलाची भूमिका निभावली आहे. हीच भूमिका आणखी मजबूत करण्याची संधी आज आपल्याला मिळालेली आहे. काही वेळापूर्वी येथून 5 हजार चारशे कोटी रुपये मूल्याच्या प्रकल्पांची कोनशीला आणि लोकार्पण झाले आहे. हे सर्व प्रकल्प या भागातील जोडणीला आणखी सशक्त करतील. येथे वायूआधारित वाहतूक व्यवस्था तसेच वायू आधारित अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल. आजच्या प्रकल्पांमुळे या पोलादी शहराची ओळख आणखी ठळक होईल. म्हणजेच हे प्रकल्प, “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” च्या मंत्रासह पश्चिम बंगालला आगेकूच करण्यात मदत करतील. यातून येथील तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य नव्या संधी देखील निर्माण होतील. मी या प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे 5,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास कामांचे केले भूमिपूजन आणि उद्घाटन
July 18th, 02:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे 5,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, स्टील सिटी म्हणून ओळखले जाणारे दुर्गापूर हे भारताच्या श्रम शक्तीचे प्रमुख केंद्र म्हणून देखील ओळखले जाते. या शहराने भारताच्या विकासात दिलेल्या योगदानाची नोंद घेऊन, ही भूमिका आणखी बळकट करण्याची आज संधी असल्याचे ते म्हणाले. आज सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे या भागातील कनेक्टिविटी वाढेल आणि गॅस-आधारित वाहतूक आणि गॅस-आधारित अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच स्टील सिटी म्हणून दुर्गापूरची ओळख आणखी मजबूत होईल, यावर मोदी यांनी भर दिला. हे प्रकल्प 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या संकल्पनेशी सुसंगत असून पश्चिम बंगालला पुढे न्यायला सहाय्य करतील, असे पंतप्रधान म्हणाले. या भागातील तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य नवीन संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले. या विकास प्रकल्पांसाठी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे सिटी गॅस वितरण प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 29th, 01:30 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सुकांत मजूमदार, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी, अलीपुरद्वारचे लोकप्रिय खासदार भाई मनोज तिग्गा, इतर खासदार, आमदार आणि पश्चिम बंगालच्या माझ्या आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथे 1010 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी
May 29th, 01:20 pm
भारतात शहर गॅस वितरण (सीजीडी) जाळे विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे सीजीडी प्रकल्पाची पायाभरणी केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांचे अलीपुरद्वारच्या ऐतिहासिक भूमीवरून अभिनंदन केले. या प्रदेशाचे समृद्ध सांस्कृतिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. हे केवळ त्याच्या सीमांनीच नव्हे तर खोलवर रुजलेल्या परंपरा आणि संबंधांनी देखील ते परिभाषित केले आहे, यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी नमूद केले की,अलीपुरद्वारच्या सीमेपलिकडे एका बाजूला भूतान आहे, तर दुसऱ्या बाजूला आसाम आहे, जलपायगुडीच्या नैसर्गिक सौंदर्याने आणि कूचबिहारच्या अभिमानाने या प्रदेशाचा अविभाज्य भाग जोडलेला आहे. बंगालच्या वारसा आणि एकतेमध्ये त्याची भूमिका अधोरेखित करून त्यांनी या समृद्ध भूमीला भेट देताना विशेष आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, बंगालचा सहभाग अपेक्षित आणि आवश्यक आहे, यावर भर देत मोदी यांनी या प्रदेशात पायाभूत सुविधा, नवोन्मेष आणि गुंतवणूकीला गती देण्यासाठी केंद्र सरकार करत असलेले निरंतर प्रयत्न अधोरेखित केले.बंगालचा विकास भारताच्या भविष्याचा आधारस्तंभ आहे,असे मोदी म्हणाले. आज या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला आहे असे त्यांनी नमूद केले. त्यांनी अलीपुरद्वार आणि कूचबिहारमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामुळे 2.5 लाखांहून अधिक कुटुंबांना वाहिनीद्वारे स्वच्छ, सुरक्षित आणि किफायतशीर गॅस उपलब्ध होईल. मोदींनी नमूद केले की या उपक्रमामुळे एलपीजी सिलिंडर खरेदी करण्याची चिंता दूर होईल आणि कुटुंबांना सुरक्षित गॅस पुरवठा सुनिश्चित होईल.There's no semblance of good governance under TMC's rule in Bengal: PM Modi in Jadavpur
May 28th, 02:39 pm
Prime Minister Narendra Modi, in grand Jadavpur rally, vowed to combat corruption in Bengal and propel its culture and economy to new heights. Addressing the huge gathering, PM Modi said, “Today, India is on the path to becoming developed. The strongest pillar of this development is eastern India. In the last 10 years, the expenses made by the BJP Government in eastern India was never made in 60-70 years.PM Modi ignites massive Barasat & Jadavpur rallies, West Bengal
May 28th, 02:30 pm
Prime Minister Narendra Modi, in grand Barasat and Jadavpur rallies, vowed to combat corruption in Bengal and propel its culture and economy to new heights. Addressing the huge gathering, PM Modi said, “Today, India is on the path to becoming developed. The strongest pillar of this development is eastern India. In the last 10 years, the expenses made by the BJP Government in eastern India was never made in 60-70 years.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रिपब्लिक शिखर परिषद 2024’ ला केले संबोधित
March 07th, 08:50 pm
हे दशक भारताचे असल्याचे पंतप्रधानांनी या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. तसेच, हे विधान राजकीय नव्हते याला आज जगाने देखील दुजोरा दिला आहे, यांची आठवण करून दिली. “हे भारताचे दशक आहे हा जगाचा विश्वास आहे”, असे सांगत पंतप्रधानांनी परिषदेच्या संकल्पनेनुसार ‘आगामी दशकातील भारत’ यावर चर्चा घडवून आणल्याबद्दल रिपब्लिक चमूच्या दृष्टीकोनाचे कौतुक केले. सध्याचे दशक हे विकसित भारताचे संकल्प पूर्ण करण्याचे एक माध्यम बनेल, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.पंतप्रधानांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 15,400 कोटी रुपयांच्या बहुविध ‘कनेक्टिव्हिटी’ प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
March 06th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथे 15,400 कोटी रुपयांच्या बहुविध ‘कनेक्टिव्हिटी’ प्रकल्पांचे लोकार्पण केले तसेच काही प्रकल्पांची पायाभरणी केली. शहरी वाहतूक क्षेत्राला पूरक असलेल्या विकास प्रकल्पांमध्ये मेट्रो रेल्वे आणि प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली (आरआरटीएस) यांचा समावेश आहे.Today's massive program underscores BJP's commitment to harnessing the power of women for India's development: PM
March 06th, 12:30 pm
Prime Minister Narendra Modi addressed the Barasat event, in West Bengal and greeted the audience with full vigour. The PM positively remarked, “Today's massive program underscores BJP's commitment to harnessing the power of women for India's development” and added that BJP has engaged thousands of women self-help groups nationwide. Today, in West Bengal, we witness a significant conference uniting sisters from these groups, furthering the cause of empowerment and progress.”PM Modi addressed at an enthusiasm-filled event in Barasat, West Bengal
March 06th, 12:09 pm
Prime Minister Narendra Modi addressed the Barasat event, in West Bengal and greeted the audience with full vigour. The PM positively remarked, “Today's massive program underscores BJP's commitment to harnessing the power of women for India's development” and added that BJP has engaged thousands of women self-help groups nationwide. Today, in West Bengal, we witness a significant conference uniting sisters from these groups, furthering the cause of empowerment and progress.”हावडा आणि न्यू जलपायगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना आणि कोलकाता मेट्रोच्या पर्पल लाईनवरील जोका- तराताला पट्ट्याच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले भाषण
December 30th, 11:50 am
आज मला तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष भेटायचे होते, मात्र माझ्या खासगी कारणास्तव मी तुमच्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, यासाठी मी तुमची, बंगालची माफी मागतो. बंगालच्या पुण्य भूमीला, कोलकाताच्या ऐतिहासिक भूमीला वंदन करण्याची आज मला संधी आहे. बंगालच्या कणा-कणांमध्ये स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समाहित आहे. ज्या भूमीवरून वंदे मातरमचा जयघोष झाला, त्या भूमीवर आज वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आज 30 डिसेंबर तारखेलाही इतिहासात खूप महत्व आहे. 30 डिसेंबर, 1943, या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान बेटावर तिरंगा ध्वज फडकवला आणि भारताच्या स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते.PM flags off Vande Bharat Express connecting Howrah to New Jalpaiguri via video conferencing
December 30th, 11:25 am
PM Modi flagged off the Vande Bharat Express, connecting Howrah to New Jalpaiguri as well as inaugurated other metro and railway projects in West Bengal via video conferencing. The PM linked reforms and development of Indian Railways with the development of the country. He said that the central government was making record investments in the modern railway infrastructure.पंतप्रधान 30 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
December 29th, 12:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर 2022 रोजी पश्चिम बंगालला भेट देतील. सकाळी 11:15 वाजता पंतप्रधान हावडा रेल्वे स्थानकावर पोहोचतील. तिथे हावडा ते न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला ते हिरवा झेंडा दाखवतील. कोलकाता मेट्रोच्या पर्पल लाईनच्या जोका-तरताला मार्गाचे उद्घाटनही करतील आणि विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करुन ते राष्ट्राला समर्पित करतील. पंतप्रधान, दुपारी 12 वाजता, आयएनएस नेताजी सुभाष येथे पोहोचतील. तिथे ते नेताजी सुभाष यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतील नंतर डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी – राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्थेचे (डीएसपीएम – एनआयडब्लूएएस) उद्घाटन करतील. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियाना अंतर्गत ते पश्चिम बंगालमधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी करुन ते राष्ट्राला समर्पित करतील. दुपारी 12:25 च्या सुमारास पंतप्रधान राष्ट्रीय गंगा परिषदेच्या दुसऱ्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.