पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

August 22nd, 05:15 pm

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी शांतनु ठाकुर जी, रवनीत सिंह जी, सुकांता मुजुमदार जी, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते शुवेंदु अधिकारी जी, संसदेतील माझे सोबती शौमिक भट्टाचार्य जी, उपस्थित अन्य लोकप्रतिनिधी गण, बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 5,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

August 22nd, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 5,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, पश्चिम बंगालच्या विकासाला गती देण्याची संधी त्यांना पुन्हा एकदा मिळाली आहे. नोआपारा ते जय हिंद विमानतळ या कोलकाता मेट्रो प्रवासाचा अनुभव सामायिक करताना मोदी म्हणाले की, या प्रवासात त्यांनी अनेक सहकाऱ्यांशी संवाद साधला आणि कोलकात्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी सहा पदरी उन्नत कोना एक्सप्रेसवेची पायाभरणी देखील केली. या हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी त्यांनी कोलकात्याच्या जनतेचे आणि पश्चिम बंगालच्या सर्व नागरिकांचे हार्दिक अभिनंदन केले.