फलनिष्पत्ती सूची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑस्ट्रेलिया दौरा
July 09th, 12:34 pm
विद्यमान सुरक्षाविषयक संयुक्त जाहीरनाम्याचे (2009) नूतनीकरण करतो. यामध्ये सैन्यांची आंतरकार्यक्षमता, क्षमता बांधणी, सागरी क्षेत्र, संरक्षण औद्योगिक सहकार्य, सायबर सुरक्षा आणि तंत्रज्ञान, दहशतवादविरोधी मोहीम, मानवतावादी सहाय्य आणि आपत्कालीन मदत (एचएडीआर) आणि UNCLOS, ASEAN, PIF, IORA मध्ये एकसंध दृष्टिकोन यांची सहकार्याची क्षेत्रे म्हणून नोंद घेण्यात आली आहे.'मन की बात'च्या 135 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (28.06.2026)
June 28th, 11:30 am
'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चं अर्धं वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण 'मन की बात' मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे.कोलकाता इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
June 25th, 11:13 am
कोलकाता येथे एका झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.कोलकाता येथे 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस दुनागिरी' आणि 'आयएनएस संशोधक' युद्धनौकांच्या जलावतरण समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 21st, 12:51 pm
आजचा दिवस अनेक अर्थांनी विशेष आहे. संपूर्ण जग 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करत आहे. मला आनंद आहे की या निमित्ताने मला बंगालच्या या महान भूमीवर येण्याची संधी मिळाली. ही ती भूमी आहे जिने भारताच्या विचारांना नवी दिशा दिली, भारताच्या पुनर्जागरणाला गती दिली आणि जिने शतकानुशतके भारताला सागरी मार्गाने जगाशी जोडले. आज याच भूमीवर 'आत्मनिर्भर भारत', 'सुरक्षित भारत' आणि 'विकसित भारत' शी संबंधित एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम होत आहे. काही वेळापूर्वीच 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस दुनागिरी' आणि 'आयएनएस संशोधक' यांचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे. योगायोगाने, 21 जून हा दिवस 'जागतिक जलविज्ञान दिन' (World Hydrography Day) म्हणूनही साजरा केला जातो. आणि हा एक विलक्षण योगायोग आहे की याच दिवशी भारताचे सर्वात प्रगत हायड्रोग्राफी जहाज, 'आयएनएस संशोधक ' नौदलात सामील करण्यात आले आहे. मी भारतीय नौदल, या प्रकल्पांशी संबंधित सर्व शास्त्रज्ञ, अभियंते, कामगार आणि माझ्या प्रिय देशवासियांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कोलकाता इथे श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरावर स्वदेशी रचना आणि स्वदेशी बनावटीच्या तीन जहाजांचे – आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय यांचे जलावतरण
June 21st, 12:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरावर, स्वदेशी बनावटीच्या आणि रचनेच्या तीन नौदल जहाजांचे - 'आयएनएस दुनागिरी' (एक प्रगत 'स्टेल्थ' फ्रिगेट), 'आयएनएस संशोधक' (एक मोठे टेहळणी जहाज) आणि 'आयएनएस अग्रय' (पाणबुडी-विरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका ) जलावतरण करण्यात आले. या जहाजांच्या समावेशामुळे देशाच्या नौदल क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होईल , सागरी क्षेत्राप्रती जागरूकता वाढेल आणि भू-राजकीय धोक्यांपासून आपल्या किनारपट्टीच्या जलक्षेत्राची सुरक्षा अधिक मजबूत होईल. या तिन्ही जहाजांचे संरेखन भारतीय नौदलाच्या 'वॉरशिप डिझाइन ब्युरो'ने केले असून त्यांची बांधणी कोलकात्यातील 'गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स' (GRSE) द्वारे करण्यात आली; यामध्ये 200 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह भारतीय उद्योगांचा मोठा सहभाग होता. 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर असलेली ही जहाजे आत्मनिर्भरतेप्रति भारताच्या वचनबद्धतेचा एक उत्तम दाखला आहेत.12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन: कोलकाता येथील काही झलक
June 21st, 06:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्याच्या ऐतिहासिक 'रेड रोड'वर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. मानवतेला मिळालेली भारताची ही अमूल्य देणगी साजरी करण्यासाठी ते सर्व स्तरांतील हजारो नागरिकांमध्ये सहभागी झाले होते. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले; योग हा संतुलन, निरामय आयुष्य आणि मानवी एकतेचा मार्ग असल्याचे सांगत त्यांनी यंदाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग यावर विशेष भर दिला.पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 21st, 06:45 am
आदरणीय राज्यपाल आर. एन. रवी जी, उर्जावान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी जी, केंद्र सरकारमधील माझे सहकारी प्रतापराव जाधव जी, मंचावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, कोलकाता येथे जमलेले सर्व सहभागी, तसेच भारतभरातून आणि जगभरातून या योग उत्सवात सहभागी होणारे सर्वजण आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालच्या कोलकाता मधील 'रेड रोड' येथे 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन
June 21st, 06:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथील 'रेड रोड'वरून 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे नेतृत्व केले. मोदी हजारो योग साधकांसोबत 'सामायिक योग प्रोटोकॉल' सत्रात सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभरातील लोकांना शुभेच्छा देताना मोदी यांनी नमूद केले की, 21 जून हा दिवस जगाच्या अनेक भागांमध्ये वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि योगच्या माध्यमातून मानवतेचा एक सर्वात मोठा सामूहिक उत्सवाचा दिवसही बनला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी इथे आयोजित पश्चिम बंग दिनाच्या सोहळ्यात झाले सहभागी
June 19th, 11:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिमबंग दिन सोहळ्यात सहभागी झाले . हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतींशी जोडले गेलेल्या ऐतिहासिक ठिकाणी या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम बंगाल: वारसा, सलोखा आणि विकास अशी यंदाच्या पश्चिमबंग दिवसाची मुख्य संकल्पना होती. ही संकल्पना पश्चिम बंगालची सांस्कृतिक समृद्धी, सामाजिक सलोखा आणि विकासात्मक आकांक्षेचे प्रतिनिधीत्व करणारी ठरली.Yoga is the best way to maintain a healthy lifestyle with minimal expense: PM Modi at World Yogasana Championship in Ahmedabad
June 04th, 06:41 pm
PM Modi inaugurated the first World Yogasana Championship in Ahmedabad, calling yoga India’s timeless gift to humanity and expressing confidence that Yogasana will gain recognition as a competitive sport in global multi-sport events, including the Olympics. Highlighting yoga’s role in health, wellness and healthy ageing, he urged participants to become ambassadors of the ‘Yoga 365’ campaign and spread yoga’s message worldwide.पंतप्रधानांच्या हस्ते गुजरात मधील अहमदाबाद येथे पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन
June 04th, 06:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे अहमदाबाद येथे पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेमुळे जागतिक क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक मैलाचा दगड प्रस्थापित झाल्याचे मानले जात आहे. आज अहमदाबादच्या भूमीवरून जगाच्या क्रीडा वारशामध्ये एक नवीन अध्याय जोडला जात आहे, असे मोदी यांनी यावेळी ठामपणे सांगितले.TMC only abuses, threatens, spreads lies: PM Modi in Barrackpore, West Bengal
April 27th, 12:00 pm
Ahead of the second phase of the West Bengal Assembly elections, Prime Minister Narendra Modi today addressed a massive rally in Barrackpore, energising the crowd with a powerful and emotive speech. Drawing from history to the present, PM Modi invoked Barrackpore’s legacy as the cradle of India’s first war of independence in 1857, positioning it as a symbol of change once again. “Barrackpore paving way for change in Bengal”, he added.PM Modi’s high-octane address electrifies Barrackpore
April 27th, 11:30 am
Ahead of the second phase of the West Bengal Assembly elections, Prime Minister Narendra Modi today addressed a massive rally in Barrackpore, energising the crowd with a powerful and emotive speech. Drawing from history to the present, PM Modi invoked Barrackpore’s legacy as the cradle of India’s first war of independence in 1857, positioning it as a symbol of change once again. “Barrackpore paving way for change in Bengal”, he added.Kolkata erupts in joy during PM Modi’s MEGA roadshow
April 26th, 08:50 pm
Prime Minister Narendra Modi held a grand roadshow in Kolkata, West Bengal. As his convoy passed through the streets of Kolkata, people lined up, cheering and greeting him, reflecting massive support for BJP in Phase 2 of the West Bengal Assembly elections.The days of TMC’s hooliganism are coming to an end: PM Modi in Kolkata, West Bengal
March 14th, 03:30 pm
Addressing a massive public meeting at the historic Brigade Parade Ground in Kolkata, Prime Minister Narendra Modi said, “This historic land of Bengal, this historic ground of Brigade Parade and this sea of people reflect the enthusiasm and spirit of the people. If anyone wants to know what Bengal is thinking and what lies in the hearts of its people, they should just look at these scenes.” He also gave a clarion call from Brigade Ground, “Paltano Dorkaar, Chai BJP Sorkaar.”PM Modi’s fiery speech electrifies the crowd in Kolkata
March 14th, 03:00 pm
Addressing a massive public meeting at the historic Brigade Parade Ground in Kolkata, Prime Minister Narendra Modi said, “This historic land of Bengal, this historic ground of Brigade Parade and this sea of people reflect the enthusiasm and spirit of the people. If anyone wants to know what Bengal is thinking and what lies in the hearts of its people, they should just look at these scenes.” He also gave a clarion call from Brigade Ground, “Paltano Dorkaar, Chai BJP Sorkaar.”Today’s projects will further strengthen the logistics system of Eastern India: PM Modi in Kolkata, West Bengal
March 14th, 02:15 pm
Inaugurating development works worth over ₹18,000 crore in Kolkata, West Bengal, PM Modi said a new chapter of development is being written for the state and Eastern India. The projects span key sectors such as roads, railways and ports. These initiatives will benefit farmers, traders, entrepreneurs, students and every section of society, laying the foundation for a developed Bengal.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधे कोलकाता इथल्या 18,700 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन
March 14th, 02:00 pm
रस्ते, रेल्वे आणि बंदर पायाभूत सुविधांशी संबंधित 18,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी या कार्यक्रमातून होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगाल आणि पूर्व भारताच्या विकासाला नवी गती मिळेल, व्यापार उदिमाला चालना मिळेल आणि लाखो लोकांना नव्या संधी मिळाल्यामुळे त्यांचे जगणे सुकर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही प्रमुख प्रकल्पांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की खरगपूर-मोरग्राम द्रुतगती मागाचे काम पूर्ण झाल्यामुळे पश्चिम बंगालमधील अनेक भागांमधल्या आर्थिक उलाढालींना वेग येईल. दुब्रजपूर बाह्यवळण मार्ग आणि कांग्सबती, शीलबती नद्यांवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलांमुळे संपर्कव्यवस्था आणखी मजबूत होईल असे त्यांनी नमूद केले. “या क्रांतिकारी प्रकल्पांसाठी पश्चिम बंगाल आणि संपूर्ण पूर्व भारतामधील नागरिकांचे मी अभिनंदन करतो,” असे मोदी म्हणाले.पंतप्रधान 14 मार्च रोजी पश्चिम बंगालला भेट देणार
March 12th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च 2026 रोजी पश्चिम बंगालला भेट देतील. दुपारी 2 वाजता पंतप्रधान कोलकाता येथे सुमारे 18,680 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.नेसेट मधले पंतप्रधानांचे संबोधन
February 25th, 08:20 pm
या प्रतिष्ठीत सदनामध्ये उपस्थित राहणे ही माझ्यासाठी भाग्याची आणि सन्मानाची बाब आहे.भारताचे पंतप्रधान म्हणून आणि एका प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या प्राचीन संस्कृतीला संबोधित करत आहे. माझ्यासमवेत 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आणि मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन मी आलो आहे.