Prime Minister shares Sanskrit Subhashitam emphasising on knowledge, skills and health

July 15th, 12:12 pm

PM Modi shared a Sanskrit Subhashitam underscoring that knowledge, skills and good health are key to personal growth and national progress. He said India's youth are embracing these values and helping build a stronger nation.

India and Indonesia are connected not only by our history but also by a shared future: PM Modi at community programme in Jakarta

July 07th, 11:47 pm

Addressing the Indian community in Jakarta, PM Modi thanked the diaspora for their warm welcome and praised their contribution to Indonesia's progress and their role as a living bridge between the two nations. He spoke about India's rapid transformation and called upon the community to contribute towards the shared aspirations of Viksit Bharat 2047 and Indonesia Emas 2045.

पंतप्रधानांनी जकार्ता येथे भारतीय समुदायाला केले संबोधित

July 07th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जकार्ता येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच, भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाने आणि भारतीयांच्या इंडोनेशियन मित्रांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि जिव्हाळ्याने स्वागत केले. विशेष आदर व्यक्त करण्याचे प्रतीक म्हणून, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे देखील या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत सहभागी झाले.

Our shared democratic values and common aspirations will take India-Indonesia relations to new heights: PM Modi at Indonesia Parliament

July 07th, 03:15 pm

Addressing the Parliament of Indonesia in Jakarta, PM Modi spoke about the deep civilisational and democratic ties between India and Indonesia. He also highlighted their maritime partnership, proposed the Ganga-Mahakam Vision and called for closer cooperation across development, security and the Global South, while reaffirming a free, open, inclusive and rules-based Indo-Pacific.

पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या संसदेला केले संबोधित

July 07th, 03:00 pm

पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची सुरुवात इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल त्यांचे, आणि संसदेच्या अध्यक्षा महामहीम पुआन महारानी यांनी दिलेल्या अगत्यपूर्ण आमंत्रणाबद्दल व भारत-इंडोनेशिया भागीदारीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानून केली. भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने खासदारांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, 'लोकशाहीची जननी' या नात्याने भारत इंडोनेशियासोबतचे लोकशाही संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सागरी संबंध अधोरेखित करत, दोन सहस्रकांहून अधिक काळ हिंदी महासागराने विचार, व्यापार, संस्कृती आणि श्रद्धेच्या देवाणघेवाणीद्वारे भारत आणि इंडोनेशियाला जोडले असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'भिन्नेक तुंगल इका' (विविधतेत एकता) या दोन्ही देशांच्या समान आदर्शांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ही मूल्ये आजही दोन्ही देशांमधील भागीदारीला दिशा देत आहेत. ते पुढे म्हणाले की, समान ऐतिहासिक प्रवास, समान आव्हाने आणि दोन्ही देशांतील जनतेच्या समान आकांक्षा यामुळे भारत आणि इंडोनेशिया नैसर्गिक आणि विश्वासू भागीदार म्हणून एकत्र आले आहेत

पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली

June 28th, 10:38 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. मोदी म्हणाले की, देशाच्या इतिहासातील एका अत्यंत कठीण कालखंडात पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण आणि शाश्वत योगदान दिले.

ज्ञान, शहाणपण आणि दूरदृष्टीचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी समाज माध्यमावर केले सामायिक

June 19th, 08:15 am

ज्ञान, शहाणपण आणि दूरदृष्टी हे गुण जीवनातील यशाची पायाभरणी करतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. हे गुण अंगी बाणविलेला मनुष्य हा अत्यंत कठीण आव्हानांना यशस्वीरित्या सामोरे जाऊ शकतो, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी सत्य, सेवा, ज्ञान आणि कृती या गुणांवर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित शेअर केले

June 18th, 09:23 am

सत्याच्या मागे संपत्ती येते, निस्वार्थ सेवेच्या मागे कीर्ती येते, सातत्यपूर्ण सरावाच्या मागे ज्ञान येते आणि कृतीतून शहाणपण प्राप्त होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ही मूल्ये व्यक्तीचे चारित्र्य घडवण्यात आणि सामूहिक प्रगतीमध्ये योगदान देण्यात महत्वाची भूमिका बजावतात, असे त्यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेकबुद्धी आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

June 16th, 08:53 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयम, विवेक आणि दूरदृष्टी यांच्या आधारावर केलेल्या कृतींमुळेच सुख-समृद्धीचे मार्ग खुले होतात, असे सांगितले. प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी त्याचा सखोल विचार आणि योग्य आकलन आवश्यक असून, यशाचा पाया नेहमीच विचारपूर्वक उचललेल्या पावलांवर उभा असतो, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी नवोन्मेष आणि उद्योजकता यातील वैविध्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

June 15th, 08:55 am

नवोन्मेष आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत आणि सर्जनशील दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि हीच विविधता नवनव्या शक्यता निर्माण करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जसे प्रत्येक पाण्याच्या स्रोताची चव वेगवेगळी असते तसेच प्रत्येक प्रतिभेची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आणि योगदान असते. वैविध्यपूर्ण विचार आणि क्षमतांच्या मिलाफातून नवोन्मेष आणि प्रगती साध्य होते, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये उन्हाळ्याच्या उष्णतेपासून बचावासाठी उपाय सांगितले आणि नागरिकांना पुरेसे पाणी पिऊन शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला.

May 31st, 11:30 am

‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत आपल्या देशातले लोक देशहितासाठी, समाजहितासाठी अशा काही अद्भूत गोष्टी करत आहेत की, जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ऍथलेटिक्समधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची येथे नॅशनल सिनियर ऍथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. यादरम्यान चार वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदरवीर सिंह, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार. या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.

पंतप्रधानांनी खऱ्या ज्ञानाच्या परिवर्तन घडवण्याच्या शक्तीवर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले

May 26th, 09:20 am

पंतप्रधान, नरेंद्र मोदी म्हणाले की, खरे ज्ञान राष्ट्र, समाज आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करत असते. आपले ज्ञान आणि कृती संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणास्रोत होणे महत्त्वाचे आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

सातत्यपूर्ण प्रयत्नावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांकडून सामाईक

May 18th, 02:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या समाजमाध्यमावर एक संस्कृत सुभाषित सामाईक केले. सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने हळूहळू ज्ञान, धन आणि धर्माची प्राप्ती होऊ शकते यावर यामध्ये भर देण्यात आला आहे.

भारत-नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारीचा मार्गदर्शक आराखडा [2026-2030]

May 17th, 03:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यात 16 मे 2026 रोजी हेग इथे द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी लक्ष्यित, कालबद्ध रितीने आखलेले उपक्रम आणि संयुक्त कृती-आराखड्याच्या माध्यमातून भारत आणि नेदरलँड्स मधील द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्यावर सहमती व्यक्त केली. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, भारत आणि नेदरलँड्स यांनी पुढील 5 वर्षांसाठी (2026-2030) भारत-नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारी विषयक मार्गदर्शक आराखड्याचा अवलंब केला आहे.

जीवनातील मोठ्यात मोठे लक्ष्य विद्येने साध्य करता येते यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

May 14th, 03:11 pm

जीवनात विद्या हे असे धन आहे ज्याने मोठ्यात मोठे लक्ष्य साध्य करता येते.यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले. विद्या आपल्याला अज्ञानाच्या अंधःकारातून बाहेर काढून यश आणि आत्मविश्वासाकडे नेते असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

गुरूंची समर्पण आणि निष्ठेने सेवा केल्यानंतर ज्ञान प्राप्त होते, यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

May 12th, 02:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गुरुंची समर्पित भावनेने आणि निष्ठेने सेवा केल्यानंतरच ज्ञान प्राप्त होते, यावर भर देणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले.

Harivansh Ji plays a key role in instilling confidence that the country can make a significant leap forward: PM Modi in the Rajya Sabha

April 17th, 11:10 am

Addressing the Rajya Sabha, PM Modi extended heartfelt congratulations to Shri Harivansh on his election as Dy Chairman of the House. Lauding Harivansh Ji’s remarkable contributions to journalism, the PM said that new Members of Parliament from both Houses could learn immensely from his insights. The PM also highlighted the significant work done by Harivansh Ji across various sectors.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेत भाषण

April 17th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित केले आणि राज्यसभेचे उपसभापती म्हणून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या हरिवंश यांचे हार्दिक अभिनंदन केले. हे एक ऐतिहासिक यश असल्याचे अधोरेखित करत, हरिवंश यांच्यावर आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवावर, सभागृहाने दाखवलेला दृढ विश्वास यातून प्रतिबिंबीत होतो, असे पंतप्रधान म्हणाले. “ सलग तिसऱ्यांदा उपसभापती म्हणून निवडून येणे, हे त्यांच्या अनुभवांवर, त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनावर आणि आणि त्यांच्या प्रतिष्ठित कार्यशैलीवर, सभागृहाने केलेले शिक्कामोर्तब आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

ज्ञानदानाच्या निरंतर क्रियेचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

February 20th, 09:29 am

ज्ञान अमर्याद असून ते सामायिक केले किंवा त्याचा विस्तार केला तरीही ते कमी होत नाही, परंतु त्याची परिपूर्णता अक्षय रहाते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे ,

PM Modi outlines the M.A.N.A.V. vision for AI at India AI Impact Summit 2026

February 19th, 10:00 am

PM Modi inaugurated the AI Impact Summit 2026 and remarked that the world’s largest AI Impact Summit is being held in India, a nation representing one-sixth of humanity. He highlighted that the core purpose of the summit is to deliberate on how AI can be made human-centric. He also presented India’s M.A.N.A.V. Vision for AI and extended an invitation to the world with the call: ‘Design and Develop in India. Deliver to the World. Deliver to Humanity’.