पंतप्रधानांचे तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मधील भाषण

November 19th, 07:01 pm

व्यासपीठावर उपस्थित तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एल मुरुगन जी, तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर के. रामासामी जी, निरनिराळ्या कृषी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आलेले सर्व मान्यवर आणि इतर सर्व लोकप्रतिनिधीवर्ग, माझे प्रिय शेतकरी बांधव आणि भगिनी तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्यासोबत सहभागी झालेले देशभरातील लाखो शेतकरी, त्यांनाही मी येथून वणक्कम म्हणतो, नमस्कार करतो आणि सगळ्यात आधी मी तुम्हा सर्वांची आणि देशभरातून जमलेल्या माझ्या शेतकरी बंधू-भगिनींची क्षमा मागतो. मला इथे येण्यासाठी जवळ जवळ एक तास उशीर झाला आहे, कारण मी आज पुट्टपर्थी इथे सत्य साई बाबांच्या कार्यक्रमात होतो, तिथला कार्यक्रम जरा जास्त वेळ लांबला, त्यामुळे मला यायला उशीर झाला, तुम्हा सर्वांची जी गैरसोय झाली, मला दिसते आहे की देशभरातील अनेक लोक इथे थांबून आहेत, याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 ला केले संबोधित

November 19th, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी कोईम्बतूरच्या पवित्र भूमीवरील दैवत मरुदमलाईच्या भगवान मुरुगन यांना वंदनही केले.कोईम्बतूरचे ही संस्कृती, करुणाभाव आणि सर्जनशीलता यांची भूमी आहे असे त्यांनी सांगितले. हे शहर दक्षिण भारताच्या उद्योजकीय शक्तीचे एक ऊर्जा केंद्र असल्याचा दखलपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. इथले वस्त्रोद्योग क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. कोईम्बतूरचे माजी खासदार सी.पी. राधाकृष्णन हे आता उपराष्ट्रपती म्हणून देशाला मार्गदर्शन करत आहेत, यामुळे आता या शहराला आणखी महत्त्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

NDA freed Bihar from Naxalism and Maoist terror — now you can live and vote fearlessly: PM Modi in Begusarai

October 24th, 12:09 pm

Addressing a massive public rally in Begusarai, PM Modi stated, On one side, there is the NDA, an alliance with mature leadership, and on the other, there is the 'Maha Lathbandhan'. He highlighted that nearly 90% of purchases in the country are of Swadeshi products, benefiting small businesses. The PM remarked that the NDA has freed Bihar from Naxalism and Maoist terror, and that every vote of the people of Bihar will help build a peaceful, prosperous state.

We’re connecting Bihar’s heritage with employment, creating new opportunities for youth: PM Modi in Samastipur

October 24th, 12:04 pm

Ahead of the Bihar Assembly elections, PM Modi kickstarted the NDA’s campaign by addressing a grand public meeting in Samastipur, Bihar. He said, “The trumpet of the grand festival of democracy has sounded. The entire Bihar is saying, ‘Phir Ek Baar NDA Sarkar!’” Remembering Bharat Ratna Jan Nayak Karpoori Thakur ji, the PM said, “It is only due to his blessings that people like us, who come from humble and backward families, are able to stand on this stage today.”

PM Modi addresses enthusiastic crowds in Bihar’s Samastipur and Begusarai

October 24th, 12:00 pm

Ahead of the Bihar Assembly elections, PM Modi kickstarted the NDA’s campaign by addressing massive gatherings in Samastipur and Begusarai, Bihar. He said, “The trumpet of the grand festival of democracy has sounded. The entire Bihar is saying, ‘Phir Ek Baar NDA Sarkar!’” Remembering Bharat Ratna Jan Nayak Karpoori Thakur ji, the PM remarked, “It is only due to his blessings that people like us, who come from humble and backward families, are able to stand on this stage today.”

वित्तीय वर्ष 2025-26 साठी विद्यमान 1.5% व्याज अनुदानासह (आयएस) सुधारित व्याज अनुदान योजना (एमआयएसएस) सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

May 28th, 03:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 2025-26 या वित्तीय वर्षासाठी सुधारित व्याज अनुदान योजना (एमआयएसएस) अंतर्गत व्याज अनुदान (आयएस) घटक सुरू ठेवण्यास मान्यता दिली आणि आवश्यक निधी व्यवस्थांना मान्यता दिली.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे विविध प्रकल्पांचा शिलान्यास आणि नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

April 11th, 11:00 am

व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, उपस्थित असलेले मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, बनास दुग्धालयाचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी आणि येथे इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आलेले माझे सर्व कुटुंबिय,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

April 11th, 10:49 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. काशीसोबत आपले गहीरे नाते असल्याचे ते म्हणाले. इथले लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखेच आहेत आणि त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपण त्यांचा अत्यंत आभारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लोकांनी दिलेल्या याच प्रेम आणि पाठबळामुळे आपण धन्य झालो असल्याचेही त्यांनी नमूद केले. काशी आपली आहे आणि आपण काशीचे आहोत, असेही ते म्हणाले. उद्या हनुमान जन्मोत्सवाचा शुभ प्रसंग आहे, याचा उल्लेख करत काशीमध्ये संकट मोचन महाराजांच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळणे, हे आपले भाग्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हनुमान जन्मोत्सवापूर्वी, काशीतील नागरिक विकासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

बिहारमधील भागलपूर येथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

February 24th, 02:35 pm

मंचावर विराजमान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान जी, बिहार चे लोकप्रिय आणि बिहारच्या विकासासाठी समर्पित आमचे लाडके मुख्यमंत्री नीतीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी शिवराजसिंह चौहान जी, जीतन राम मांझी जी, ललन सिंह जी, गिरीराज सिंह जी, चिराग पासवान जी, राज्यमंत्री रामनाथ ठाकूर जी, बिहार सरकारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी जी, विजय सिन्हा जी, राज्याचे इतर मंत्री आणि लोकप्रतिनिधीगण, उपस्थित मान्यवर आणि बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी,बिहारमधील भागलपूर येथून विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन

February 24th, 02:30 pm

शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रति आपल्या वचनबद्धतेला अनुसरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी केला.याप्रसंगी त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे देखील उद्घाटन केले. मोदी यांनी सर्व मान्यवरांचे आणि कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभागी झालेल्या लोकांचे स्वागत केले. महाकुंभच्या पवित्र काळात मंदारचलच्या भूमीवर पाऊल ठेवणे हे मोठे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की या भूमीमध्ये आध्यात्म,वारसा आणि विकसित भारताची क्षमता देखील आहे. ही शहीद तिलका मांझी यांची भूमी आहे तसेच रेशीम नगरी म्हणून देखील प्रसिद्ध आहे असे मोदी म्हणाले. बाबा अजगैबीनाथांच्या पवित्र भूमीत महाशिवरात्रीसाठी जोरदार तयारी देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अशा पवित्र मुहूर्तावर पीएम किसानचा 19 वा हप्ता जारी करण्याचे भाग्य मला लाभले आणि थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सुमारे 22,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले.

केंद्रीय अर्थसंकल्पावरील पंतप्रधानांच्या टिप्पणीचा मजकूर

February 01st, 03:00 pm

आज भारताच्या विकास प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा अर्थसंकल्प आहे. हा प्रत्येक भारतीयाचे स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे. आम्ही अनेक क्षेत्रे तरुणाईसाठी खुली केली आहेत. सामान्य नागरिक, विकसित भारताच्या मोहिमेला पुढे घेऊन जाणार आहे. हा अर्थसंकल्प एक फोर्स मल्टिप्लायर म्हणजे बळ बहुगुणीत करणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे बचत वाढेल, गुंतवणूक वाढेल, वापर वाढेल आणि विकासालाही गती मिळेल. मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे , हा जनता जनार्दनाचा अर्थसंकल्प… लोकांचा अर्थसंकल्प दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो.

केंद्रिय अर्थसंकल्प 2025-26 वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

February 01st, 02:30 pm

आर्थिक वर्ष 2025-26 च्या केंद्रिय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. भारताच्या विकासाच्या प्रवासातला हा मैलाचा दगड असल्याचा मुद्दा अधोरेखित करुन मोदी म्हणाले की, या अर्थसंकल्पात 140 कोटी भारतीयांच्या आशाआकांक्षा प्रतिबिंबित झाल्या आहेत आणि प्रत्येक नागरिकांचे स्वप्न यामुळे पूर्ण होईल. युवकांसाठी विविध क्षेत्रांची दारं खुली झाली आहेत आणि विकसित भारत हे अभियान आता सामान्य नागरिक पुढे नेतील. हा अर्थसंकल्प देशाचे सामर्थ्य कित्येक पटींनी वाढवणारा आहे. बचत, गुंतवणूक, क्रयशक्ती आणि विकास यामध्ये यामुळे वाढ होईल या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. जनतेचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांनी केंद्रिय अर्थ आणि आर्थिक व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Our government's intentions, policies and decisions are empowering rural India with new energy: PM

January 04th, 11:15 am

PM Modi inaugurated Grameen Bharat Mahotsav in Delhi. He highlighted the launch of campaigns like the Swamitva Yojana, through which people in villages are receiving property papers. He remarked that over the past 10 years, several policies have been implemented to promote MSMEs and also mentioned the significant contribution of cooperatives in transforming the rural landscape.

PM Modi inaugurates the Grameen Bharat Mahotsav 2025

January 04th, 10:59 am

PM Modi inaugurated Grameen Bharat Mahotsav in Delhi. He highlighted the launch of campaigns like the Swamitva Yojana, through which people in villages are receiving property papers. He remarked that over the past 10 years, several policies have been implemented to promote MSMEs and also mentioned the significant contribution of cooperatives in transforming the rural landscape.

मध्य प्रदेशातील खजुराहो येथे केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मूळ मजकूर

December 25th, 01:00 pm

वीरांची भूमी बुंदेलखंडातील माझ्या सर्व बांधवांना माझा नमस्कार. मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, येथील कार्यतत्पर मुख्यमंत्री भाई मोहन यादवजी, केंद्रीय मंत्री शिवराजसिंहजी, वीरेंद्रकुमारजी, सीआर पाटीलजी, उपमुख्यमंत्री जगदीश देवडाजी, राजेंद्र शुक्लाजी, अन्य मंत्रीगण, खासदार, आमदार, अन्य मान्यवर, पूज्य संत मंडळी आणि मध्यप्रदेशातील माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात खजुराहो येथे केली केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी

December 25th, 12:30 pm

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात खजुराहो येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारत आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याची आठवण करत मोदी यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या एका वर्षात हजारो कोटी रुपयांच्या नव्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे विकासकामांना गती मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. आज ऐतिहासिक केन-बेतवा नदी जोड प्रकल्प, दौधन धरण आणि ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प या मध्य प्रदेशच्या पहिल्या सौर प्रकल्पाची पायाभरणी झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यासाठी त्यांनी मध्य प्रदेशच्या जनतेचे अभिनंदन केले.

कैथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया द्वारा आयोजित ख्रिसमस समारंभातील पंतप्रधानांचे भाषण

December 23rd, 09:24 pm

आता तीन-चार दिवसापूर्वीच मी माझे सहकारी भारत सरकारमधील मंत्री जॉर्ज कुरियन जी यांच्याकडे ख्रिसमस निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आणि आज तुमच्या समवेत उपस्थित राहण्याचा आनंद मिळत आहे. कैथलिक बिशप्स कौन्फरन्स औफ इंडिया- सीबीसीआय चे हे आयोजन ख्रिसमसच्या आनंदात तुमच्याबरोबर सहभागी होण्याची ही संधी, हा दिवस आपणा सर्वांसाठी अविस्मरणीय राहणार आहे. ही संधी यासाठी देखील खास आहे, कारण याच वर्षी सीबीसीआय च्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मी सीबीसीआय आणि त्यांच्याशी संलग्न सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.

कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या नाताळ कार्यक्रमामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी

December 23rd, 09:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील सीबीसीआय केंद्र परिसरातील ‘कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया’च्या वतीने आयोजित केलेल्या नाताळ साजरा करण्‍याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. भारतातील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयामध्‍ये होणा-या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. कार्डिनल, बिशप आणि चर्चमधील प्रमुख नेत्यांसह ख्रिश्चन समुदायातील प्रमुख नेत्यांशीही यावेळी पंतप्रधानांनी संवाद साधला.

छत्तीसगडमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महतारी वंदन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 10th, 02:30 pm

माता दंतेश्वरी,माता बमलेश्वरी आणि माता महामाया यांना मी आदरपूर्वक नमन करतो. छत्तीसगडच्या माता भगिनींना माझा नमस्कार . दोन आठवड्यांपूर्वी मी छत्तीसगडमध्ये 35 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले होते.आणि आज मला नारी शक्तीच्या सक्षमीकरणासाठी महतारी वंदन योजनेचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य लाभले आहे. महतारी वंदन योजनेंतर्गत, छत्तीसगडमधील 70 लाखांहून अधिक माता-भगिनींना दरमहा एक हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. भाजप सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले आहे. आज महतारी वंदन योजनेअंतर्गत 655 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये महतारी वंदन योजनेचा केला प्रारंभ

March 10th, 01:50 pm

आमचे सरकार प्रत्येक कुटुंबाचे सर्वांगीण कल्याण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि याची सुरुवात महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाने होते