महामहीम राजे चार्ल्स तृतीय यांनी दिलेल्या कदंब रोपट्याचे पंतप्रधानांनी केले रोपण

September 19th, 05:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7, लोक कल्याण मार्ग येथे महामहीम राजे चार्ल्स तृतीय यांनी भेट दिलेले कदंब रोपट्याची लागवड केली. “पर्यावरण आणि शाश्वततेबद्दल त्यांना अतिशय जिव्हाळा आहे ज्याची आम्ही नेहमीच विशेषत्वाने चर्चा करत असतो,” असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी यूकेचे सन्माननीय राजे चार्ल्स तिसरे यांची घेतली भेट

July 24th, 11:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ब्रिटन भेटीमध्‍ये यूकेचे सन्माननीय राजे चार्ल्स तिसरे यांची, त्यांच्या उन्हाळी निवासस्थान- सँडरिंगहॅम इस्टेट इथे भेट घेतली. पंतप्रधानांनी राजांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याबद्दल आणि त्यांचे शाही कामकाज पुन्हा सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधान आणि राजांनी आरोग्य आणि शाश्वत जीवनशैलीशी संबंधित बाबींवर चर्चा केली, ज्यामध्‍ये आयुर्वेद आणि योगसाधनेचा समावेश होता, तसेच त्यांचे फायदे जगभरातील लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील, यावरही विचारमंथन झाले.

युनायटेड किंगडम आणि मालदीव दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे प्रस्थान निवेदन

July 23rd, 01:05 pm

भारत आणि युके दरम्यान व्यापक धोरणात्मक भागीदारी असून, अलिकडच्या वर्षांत यामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. आमचे सहकार्य व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण, शिक्षण, संशोधन, शाश्वतता, आरोग्य आणि परस्परांच्या जनतेमधील संबंध, यासह विविध क्षेत्रांमध्ये विस्तारले आहेत. पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्या बरोबरच्या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमध्ये समृद्धी, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी परस्परांबरोबरची आर्थिक भागीदारी आणखी वाढवण्याची संधी आम्हाला मिळेल. या दौऱ्या दरम्यान, किंग चार्ल्स III (तृतीय) यांची भेट घेण्यासाठी देखील उत्सुक आहे.

पंतप्रधानांची युनायटेड किंगडम आणि मालदीव भेट (23 – 26 जुलै 2025)

July 20th, 10:49 pm

पंतप्रधान मोदी 23 - 26 जुलै दरम्यान UK ला अधिकृत भेट देणार असून मालदीवचा सरकारचे निमंत्रित अतिथी म्हणून दौरा करणार आहेत. ते पंतप्रधान स्टार्मर यांच्याशी विस्तृत चर्चा करतील तसेच CSP च्या प्रगतीचा आढावा देखील घेतील. 26 जुलै रोजी मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्य वर्धापन दिन सोहळ्याचे पंतप्रधान मोदी 'सन्माननीय अतिथी' असतील. ते मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांची भेट घेणार असून त्यांच्यात परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे राजे चार्ल्स III यांच्यासमवेत केली चर्चा

December 19th, 06:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रिटनचे राजे चार्ल्स III यांच्यासोबत चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यानच्या ऐतिहासिक संबंधांचे स्मरण करत दोन्ही नेत्यांनी भारत आणि ब्रिटन यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.त्यांनी राष्ट्रकुल देश आणि अलीकडेच सॅमोआ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल देशांच्या सरकारच्या प्रमुखांच्या बैठकीबाबत परस्परांसोबत विचारविनिमय केला.