केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम,2026 (दिनांक 01.04.2026 ते 30.09.2026)साठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (पी अँड के) खतांवरील पोषक तत्त्व आधारित अनुदानाच्या (एनबीएस) दरांना दिली मंजुरी

April 08th, 04:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज खते विभागाच्या, खरीप हंगाम 2026 (01.04.2026 ते 30.09.2026) साठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (पी अँड के) खतांवरील पोषक तत्त्व आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. खरीप हंगाम 2026 साठी अंदाजित अर्थसंकल्पीय आवश्यकता सुमारे 41,533.81 कोटी रुपये असेल. ही रक्कम खरीप 2025 हंगामाच्या अर्थसंकल्पीय आवश्यकतेपेक्षा अंदाजे 4,317 कोटी रुपयांनी अधिक आहे. खरीप 2025 साठीचा अर्थसंकल्प 37,216.15 कोटी रुपये होता.