ओडिशामधील रामेश्वर ते पारादीप दरम्यान नवीन सागरी महामार्गाच्या (एकूण 163.180 किमी लांबीच्या दोन टप्प्यांतील सागरी महामार्गाचा भाग) हायब्रीड ॲन्युइटी मोडवरील बांधकामाला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

June 03rd, 03:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज ओडिशामध्ये रामेश्वर ते पारादीप दरम्यान हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल (HAM) वर आधारित दोन टप्प्यांच्या पॅकेजेसद्वारे नवीन सागरी महामार्गाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या महामार्गाची एकूण लांबी 160.18 किमी असून भांडवली खर्च 8300.79 कोटी रुपये अपेक्षित आहे.