राष्ट्रीय क्रीडा दिनी बिहारमधील राजगीर इथे सुरू होत असलेल्या पुरुष हॉकी आशिया चषक 2025 या स्पर्धेसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
August 28th, 09:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरुष हॉकी आशिया कप 2025 मध्ये सहभागी झालेल्या आशियातील सर्व संघांना, खेळाडूंना, अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या समर्थकांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. बिहारमधील राजगीर या ऐतिहासिक शहरात उद्या 29 ऑगस्ट रोजी या स्पर्धेला सुरुवात होईल. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचेही कौतुक केले आहे. बिहार हे अलिकडच्या काळात एक बहुआयामी क्रीडा केंद्र म्हणून उदयाला आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिहारने खेलो इंडिया युथ गेम्स 2025, 20 वर्षांखालील आशिया रग्बी सेव्हन्स अजिंक्यपद स्पर्धा 2025, आंतरराष्ट्रीय सेपाकटकरॉ महासंघाची (ISTAF - International Sepaktakraw Federation) सेपाकटकरॉ विश्वचषक स्पर्धा 2024 आणि महिला आशियाई अजिंक्यपद चषक 2024 यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.‘खेलो इंडिया’च्या 7 व्या युवा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेले भाषण
May 04th, 08:16 pm
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व खेळाडूंचे मी मनापासून स्वागत करतो - प्रत्येकजण एकमेकांपेक्षा अधिक चांगला आणि प्रत्येकजण एकमेकांपेक्षा अधिक प्रतिभावान आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला केले संबोधित
May 04th, 08:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी उपस्थित खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा कर्मचाऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, या स्पर्धेत देशभरातील खेळाडू सहभागी होत असून त्यांचे अद्वितीय कौशल्य आणि दृढनिश्चय दिसून येत आहे. देशाच्या क्रीडा क्षेत्रातील चैतन्यदायी उत्साहात योगदान देत हे खेळाडू दाखवत असलेले समर्पण आणि कठोर परिश्रम यांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. खेळाडूंचे कौशल्य आणि वचनबद्धता उल्लेखनीय आहे, खेळाचा ध्यास आणि सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या त्यांच्या निर्धाराचा देशाला अभिमान आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भविष्यातील उज्ज्वल कामगिरीसाठी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.The National Games are a celebration of India's incredible sporting talent: PM Modi in Dehradun
January 28th, 09:36 pm
PM Modi during the 38th National Games inauguration in Dehradun addressed the nation's youth, highlighting the role of sports in fostering unity, fitness, and national development. He emphasized the government's efforts in promoting sports, the importance of sports infrastructure, and India's growing sports economy.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डेहराडून येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
January 28th, 09:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील डेहराडून येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की आज उत्तराखंड युवकांच्या ऊर्जेने अधिक झळाळून निघाले आहे. ते पुढे म्हणाले की, बाबा केदारनाथ, बद्रीनाथ आणि गंगा मातेच्या आशीर्वादाने आज 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. उत्तराखंडच्या स्थापनेचे हे 25 वे वर्ष आहे असे अधोरेखित करून,मोदी म्हणाले की या तरुण राज्यात देशभरातील युवक त्यांची क्षमता प्रदर्शित करणार आहेत.राम प्रत्येकाच्या हृदयात आहे: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
January 28th, 11:30 am
यावेळी देशातील अनेकांनी राम भजने गाउन श्री रामाच्या चरणी समर्पित केली. 22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती लावून दिवाळी साजरी केली. या काळात, देशाने सामूहिकतेमधील शक्ती पाहिली. ही सामूहिकतेची शक्ती आपल्या विकसित भारतासाठी केलेल्या संकल्पांचादेखील एक प्रमुख आधार आहे. मी देशवासियांना, मकर संक्रांती ते 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याची विनंती केली होती. हे ऐकून मला आनंद झाला की लाखो लोक ह्या अभियानात भक्तीभावाने सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या परिसरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली. अनेक लोकांनी मला यासंबंधीची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवले आहेत. ही भावना, ही इच्छा कधीच संपू नये, ही मोहीम थांबू नये. सामूहिकतेची हीच शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल.तमिळनाडूत चेन्नई इथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभातले पंतप्रधानांचे संबोधन
January 19th, 06:33 pm
13 व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो.भारतीय क्रीडा विश्वासाठी 2024 ची सुरवात करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.इथे जमलेले माझे युवा मित्र युवा भारत,नव भारताचे प्रतिनिधित्व करतात. यांची ऊर्जा आणि उत्साह क्रीडा विश्वात आपल्या देशाला नव्या शिखरावर नेत आहे.देशभरातून चेन्नईला आलेल्या सर्व खेळाडूंना आणि क्रीडा प्रेमींना माझ्या शुभेच्छा.आपण सर्वजण एकत्रितपणे खऱ्या अर्थाने एक भारत श्रेष्ठ भारत चे दर्शन घडवत आहात.तामिळनाडूचे स्नेह पूर्ण लोक,लालित्यपूर्ण तमिळ भाषा,संस्कृती आणि खाद्य संस्कृती यामुळे आपणा सर्वांना आपुलकीचा प्रत्यय येईल.त्यांचे आदरातिथ्य आपणा सर्वांची मने जिंकेल याचा मला विश्वास आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आपल्यातल्या कौशल्याचे दर्शन घडवण्याची संधी नक्कीच देईल.त्याचबरोबर आपल्याला आयुष्य भर साथ देणारी नवी मैत्रीही जोडण्यासाठी मदत करेल.पंतप्रधानांच्या हस्ते तमिळनाडूतील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 चे उद्घाटन
January 19th, 06:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूत चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 सोहळ्याचे उद्घाटन केले. मोदी यांनी प्रसारण क्षेत्राशी संबंधित सुमारे 250 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणीही केली. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाचे प्रतीक म्हणून त्यांनी दोन खेळाडूंनी दिलेली स्पर्धेची मशाल एका मोठ्या भांड्यात (cauldron) ठेवली.