रब्बी 2025-26 हंगामासाठी फॉस्फेट आणि पोटॅश खतांवर पोषक तत्व आधारित अनुदान दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता

October 28th, 03:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज रब्बी हंगाम 2025-26 (01.10.2025 ते 31.03.2026 पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅश (पी अँड के) खतांवर पोषक तत्व आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. रब्बी हंगाम 2025-26 साठी अंदाजे 37,952.29 कोटी रुपयांची आवश्‍यकता असून ती 2025 मधील खरीप हंगामाच्या अर्थसंकल्पीय गरजेपेक्षा 736 कोटी रुपयांनी जास्त आहे.

नवी दिल्ली इथे एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेतले पंतप्रधानांचे संबोधन

August 07th, 09:20 am

मंत्रिमंडळातले माझे सहकारी शिवराज सिंह चौहान जी, एम एस स्वामीनाथन संशोधन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉ सौम्या स्वामिनाथन जी,नीती आयोगाचे सदस्य डॉ रमेश चंद जी,स्वामिनाथन जी यांच्या कुटुंबातले सर्व जण इथे उपस्थित असलेले मी पाहत आहे, त्यांनाही माझा नमस्कार.सर्व वैज्ञानिक, इतर मान्यवर आणि महिला आणि पुरुषहो !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

August 07th, 09:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. प्राध्यापक एम एस स्वामिनाथन हे एक द्रष्टे होते ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते सीमित नव्हते , असे त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी सांगितले. प्राध्यापक स्वामिनाथन हे एक थोर शास्त्रज्ञ होते ज्यांनी विज्ञानाला लोकसेवेचे माध्यम बनवले असे ते म्हणाले. राष्ट्राला अन्नसुरक्षा बहाल करण्यासाठी प्राध्यापक स्वामिनाथन यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे त्यांनी अधोरेखित केले. प्राध्यापक स्वामिनाथन यांनी एक अशी चेतना निर्माण केली जी भारताच्या पुढील अनेक शतकांच्या धोरणांमध्ये आणि प्राधान्यक्रमांमध्ये झळकत राहील, असे पंतप्रधान म्हणाले. एम.एस.स्वामीनाथन शताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

July 16th, 02:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेला सहा वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी मिळाली. या योजनेचा प्रारंभ 2025-26 पासून 100 जिल्ह्यांत होणार आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून कृषी आणि पूरक/संलग्न क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारी पहिलीच योजना आहे.

बिहारमधील काराकाट येथे विविध प्रकल्पांच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 30th, 11:29 am

बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान जी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जीतन राम मांझी जी, लल्लन सिंह जी, गिरीराज सिंह जी, चिराग पासवान जी, नित्यानंद राय जी, सतीश चंद्र दुबे जी, राजभूषण चौधरी जी, राज्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी जी, विजय कुमार सिन्हा जी, उपस्थित अन्य मंत्रीगण, लोकप्रतिनिधी आणि बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील कराकत येथे 48,520 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

May 30th, 10:53 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील कराकत येथे 48,520 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेकविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. यावेळी झालेल्या सभेला संबोधित करताना, या पवित्र भूमीवर बिहारच्या विकासाला गती देण्याचे भाग्य आपल्याला लाभले असल्याचे म्हणत त्यांनी 48,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होत असल्याचे स्पष्ट केले. आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येथे मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित असल्याचे म्हणत बिहारच्या जनतेने दाखविलेली आपुलकी आणि प्रेमाबद्दल त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांचा पाठिंबा आपल्यासाठी कायमच शिरोधार्य असल्याचे नमूद केले. त्यांनी बिहारच्या माता-भगिनींचेही मनापासून कौतुक केले.

विकसित कृषी संकल्प अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्‍यमातून केलेले भाषण

May 29th, 06:45 pm

आज, भगवान जगन्नाथांच्या आशीर्वादाने देशातील शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी मोहीम सुरू होत आहे. ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ हा एक अनोखा उपक्रम आहे. पावसाळ्याची चाहूल लागली आहे, खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे आणि अशा परिस्थितीत, देशातील शास्त्रज्ञ, तज्ञ, अधिकारी आणि प्रगतीशील शेतकऱ्यांची दोन हजारपेक्षा जास्त पथके पुढचे 12 ते 15 दिवस गावोगावी जात आहेत. ही पथके देशातील 700 पेक्षा जास्त जिल्ह्यांमधल्या कोट्यवधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. देशातील सर्व शेतकऱ्यांना, या पथकांमध्ये सहभागी असलेल्या सर्व सहकाऱ्यांना, या महान मोहिमेसाठी, एका मोठ्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी आणि शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित कृषी संकल्प अभियानाला केले संबोधित

May 29th, 06:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित कृषी संकल्प अभियानाला संबोधित केले. याप्रसंगी ते म्हणाले की, विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे तसेच कृषी विकासाला पाठबळ देण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, मान्सूनच्या प्रारंभासोबत आणि खरीप हंगामाची तयारी सुरू होण्यासोबत, पुढील 12 ते 15 दिवसांमध्ये वैज्ञानिक, तज्ञ, अधिकारी आणि प्रगतीशील शेतकरी यांची 2000 पथके 700 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रवास करतील आणि गावोगावी लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. भारताच्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्याप्रति त्यांच्या समर्पणाची दखल घेत , त्यांनी सर्व शेतकरी आणि या पथकांमधील सहभागींना शुभेच्छा दिल्या.

2025-26 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) मंत्रिमंडळाने दिली मान्यता

May 28th, 03:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2025-26 च्या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या 14 वाणांसाठी किमान आधारभूत किमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे.

अर्थसंकल्पानंतर कृषी आणि ग्रामीण समृद्धीसंबंधित वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 01st, 01:00 pm

या वर्षीचा अर्थसंकल्प हा आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वंकष अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पातून आमच्या धोरणांमधील सातत्य तर दिसून आलेच पण त्याचबरोबर विकसित भारताच्या संकल्पनेचा नवा विस्तार देखील दिसला. अर्थसंकल्पापूर्वी तुम्हा भागधारकांनी जी मौल्यवान माहिती दिली, ज्या सूचना केल्या, त्या अर्थसंकल्प तयार करण्यात आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरल्या. आता या अर्थसंकल्पातील बाबी अधिक प्रभावी पद्धतीने प्रत्यक्षात अमलात आणण्यात, या अर्थसंकल्पातील बाबींचा परिणाम खरोखरीच अधिकाधिक उत्तम आणि जलद पद्धतीने साध्य व्हावा, सगळे निर्णय आणि धोरणे प्रभावी व्हावीत या साठी तुम्हा सर्वांच्या भूमिकेची जबाबदारी अधिकच वाढली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी आणि ग्रामीण समृद्धीवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित

March 01st, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीवरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधील सहभागाचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि या वर्षीचा अर्थसंकल्प हा सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे, जो धोरणांमध्ये सातत्य आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाचा नवा विस्तार दर्शवितो असे अधोरेखित केले. अर्थसंकल्पापूर्वी सर्व संबंधितांकडून मिळालेल्या मौल्यवान माहिती आणि सूचनांची त्यांनी दखल घेतली , ज्या खूप उपयुक्त होत्या. हा अर्थसंकल्प अधिक प्रभावी बनवण्यात हितधारकांची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे यावर त्यांनी भर दिला. विकसित भारताच्या ध्येयाच्या दिशेने आमचा संकल्प अतिशय स्पष्ट आहे आणि एकत्रितपणे आम्ही अशा भारताची उभारणी करत आहोत जिथे शेतकरी समृद्ध आणि सक्षम असतील, असे मोदी म्हणाले. एकही शेतकरी मागे राहू नये, प्रत्येक शेतकऱ्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कृषी क्षेत्र हे विकासाचे पहिले इंजिन मानून शेतकऱ्यांना गौरवपूर्ण स्थान दिले आहे असे ते म्हणाले. भारत एकाच वेळी दोन प्रमुख उद्दिष्टांच्या दिशेने काम करत आहे: कृषी क्षेत्राचा विकास आणि गावांची समृद्धी, असे त्यांनी नमूद केले.

विपणन हंगाम 2024-25 साठी खरीप पिकांसाठी किमान हमी भावात (एमएसपी) वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

June 19th, 09:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज विपणन हंगाम 2024-25 साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठीच्या किमान हमी भावात (एमएसपी)/ किमान आधारभूत किमतीत वाढ करायला आज मंजुरी दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम, 2024 साठी (01.04.2024 ते 30.09.2024 पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (P&K) खतांवर पोषण तत्व आधारित अनुदान दरांना तसेच पोषण तत्वांवर आधारित अनुदान योजनेत 3 नवीन खत श्रेणींचा समावेश करण्यास दिली मंजुरी

February 29th, 04:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम, 2024 साठी (01.04.2024 ते 30.09.2024 पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (P&K) खतांवर पोषण तत्व आधारित अनुदान दर निश्चित करण्याच्या, खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.पोषण तत्वांवर आधारित अनुदान योजनेअंतर्गत 3 नवीन खतांचे प्रकार समाविष्ट करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. खरीप हंगाम 2024 साठी तात्पुरती अर्थसंकल्पीय गरज अंदाजे 24,420 कोटी रुपये असेल.

किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याच्या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

June 09th, 08:33 pm

शेतकऱ्यांचा आनंद सरकारला नव्या जोमाने काम करण्यास प्रेरित करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

विपणन हंगाम 2023-24 साठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीला (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

June 07th, 05:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) विपणन हंगाम 2023-24 साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये लखनौ येथे आयोजित जागतिक गुंतवणुकदार संमेलन 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 10th, 11:01 am

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यजी, ब्रजेश पाठकजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आणि इथले लखनौचे प्रतिनिधी राजनाथ सिंहजी, विविध देशांमधून आलेले सर्व ज्येष्ठ मान्यवर, उत्तर प्रदेशचे सर्व मंत्री आणि जागतिक गुंतवणूकदार संमेलनासाठी उपस्थित उद्योग क्षेत्रातील आदरणीय सदस्य, जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार, धोरणकर्ते, कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज आणि बधु भगिनिंनो!

लखनौ येथे उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 चे पंतप्रधानांनी केले उद्घाटन

February 10th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथे जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि इन्व्हेस्ट यूपी 2.0 चा शुभारंभ केला. उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 ही उत्तर प्रदेश सरकारची प्रमुख गुंतवणूक परिषद असून, ही परिषद धोरणकर्ते, औद्योगिक क्षेत्रातील नेते, शिक्षण तज्ञ, विचारवंत आणि जगभरातील नेत्यांना एकत्रितपणे व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी आणि भागीदारी करण्यासाठी एकत्र आणणार आहे. पंतप्रधानांनी यावेळी आयोजित प्रदर्शनालाही भेट दिली.

विपणन हंगाम 2022-23 साठी खरीप पिकांसाठीच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करायला (एमएसपी) आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीची मंजुरी

June 08th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) विपणन हंगाम 2022-23 साठी सर्व अनिवार्य खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.

विशेष गुणधर्म असलेल्या 35 प्रकारच्या पिकांच्या वाणांचे रायपूर, छत्तीसगड इथे लोकार्पण केल्यानंतरचे पंतप्रधानांचे भाषण

September 28th, 11:01 am

नमस्कार जी! केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्रीमान नरेंद्र सिंह तोमरजी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्रीमान भूपेश बघेलजी, मंत्रिमंडळातील माझे अन्य सहकार श्री पुरुषोत्तम रुपालाजी, श्री कैलाश चौधरीजी, भगीनी शोभाजी, छत्तीसगडचे माज मुख्यमंत्री श्री रमन सिंहजी, विरोधीपक्ष नेते श्री धर्म लाल कौशिकजी, कृषी शिक्षणासंबंधित सर्व कुलगुरु, संचालक, वैज्ञानिक सहकारी आणि माझ्या प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो !

विशेष गुणधर्म असलेल्या 35 प्रकारच्या पिकांच्या वाणांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

September 28th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कृषिपिकांच्या विशेष गुणधर्म असलेल्या वाणांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. तसेच, रायपूर इथे विकसित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जैविक तणाव व्यवस्थापन संस्थेच्या नव्या परिसराचेही पंतप्रधानांनी लोकार्पण केले.