पीएमएनआरएफमधून सानुग्रह मदत देण्याची पंतप्रधानांकडून घोषणा
October 02nd, 11:36 pm
मध्य प्रदेशात खांडवा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ) 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा त्यांनी केली.