वाराणसीहून चार वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 08th, 08:39 am

उत्तर प्रदेशचे उर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि विकसित भारताचा मजबूत पाया रचण्यासाठी आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या उत्कृष्ट कामाचे नेतृत्व करणारे अश्विनी वैष्णव जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमात आपल्यासोबत एर्नाकुलम इथून सहभागी झालेले केरळचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सुरेश गोपी जी, जॉर्ज कुरियन जी, केरळमधील या कार्यक्रमात उपस्थित असलेले इतर सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधी, फिरोजपूर इथून जोडले गेलेले केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि पंजाबचे नेते रवनीत सिंग बिट्टू जी, तेथे उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, लखनौ इथून जोडले गेलेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, इतर मान्यवर आणि काशीतील माझे कुटुंबीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीहून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा

November 08th, 08:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. देशाच्या आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि बाबा विश्वनाथांचे पवित्र शहर असलेल्या वाराणसीतील सर्व कुटुंबांना आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या. देव दिवाळीच्या काळात झालेल्या अद्वितीय उत्सवाचे त्यांनी कौतुक केले आणि आजचा दिवसदेखील एक शुभ प्रसंग असल्याचे सांगितले. विकासाच्या या उत्सवासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

मध्य प्रदेशातील खजुराहो येथे केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मूळ मजकूर

December 25th, 01:00 pm

वीरांची भूमी बुंदेलखंडातील माझ्या सर्व बांधवांना माझा नमस्कार. मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, येथील कार्यतत्पर मुख्यमंत्री भाई मोहन यादवजी, केंद्रीय मंत्री शिवराजसिंहजी, वीरेंद्रकुमारजी, सीआर पाटीलजी, उपमुख्यमंत्री जगदीश देवडाजी, राजेंद्र शुक्लाजी, अन्य मंत्रीगण, खासदार, आमदार, अन्य मान्यवर, पूज्य संत मंडळी आणि मध्यप्रदेशातील माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात खजुराहो येथे केली केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी

December 25th, 12:30 pm

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात खजुराहो येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारत आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याची आठवण करत मोदी यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या एका वर्षात हजारो कोटी रुपयांच्या नव्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे विकासकामांना गती मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. आज ऐतिहासिक केन-बेतवा नदी जोड प्रकल्प, दौधन धरण आणि ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प या मध्य प्रदेशच्या पहिल्या सौर प्रकल्पाची पायाभरणी झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यासाठी त्यांनी मध्य प्रदेशच्या जनतेचे अभिनंदन केले.