राज्याचे ‘केरळ’ ऐवजी ‘केरलम’ असे नामांतर केल्याबद्दल प्रख्यात मल्याळी साहित्यिकांनी पंतप्रधानांचे मानले आभार
February 27th, 07:34 pm
प्रख्यात मल्याळी साहित्यिकांच्या एका प्रतिनिधीमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ‘केरळ’ राज्याचे ‘केरलम’ असे नामांतर केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.केरळ राज्याचे नाव बदलून केरळम् असे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
February 24th, 03:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केरळ राज्याचे नाव बदलून केरळम् असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.मन की बात फेब्रुवारी 2026
February 22nd, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे, शुभेच्छा आहेत. (अभिनंदन आहे.) मन की बात हे देशाच्या आणि देशवासियांच्या कार्यकर्तृत्वाला (उपलब्धी) सर्वांसमोर आणण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ आहे. नुकत्याच दिल्लीत संपन्न झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देशाने अशीच एक उपलब्धी पाहिली. अनेक देशांतील नेते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, नवोन्मेषक आणि स्टार्ट अप क्षेत्राशी संबंधित लोक, एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारत मंडपम मध्ये एकत्र आले होते. आगामी एआय च्या शक्तीचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दृष्टीने ही शिखर परिषद एक महत्त्वाचे वळण ठरली.केरळच्या आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 28th, 02:39 pm
आज या प्रतिष्ठेच्या प्रसंगी, तुम्हा सर्वांशी जोडले जाणे माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आयुर्वेदाचे जतन, संरक्षण आणि प्रसार करण्यात आर्य वैद्यशाळेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आपल्या 125 वर्षांच्या प्रवासात या संस्थेने, आयुर्वेदाला उपचाराची एक सशक्त व्यवस्था म्हणून प्रस्थापित केले आहे. आज या निमित्ताने, मी आर्य वैद्यशाळेचे संस्थापक, वैद्यरत्नम पी. एस. वारियर जी यांच्या योगदानाचे स्मरण करतो. आयुर्वेदाप्रति त्यांचा दृष्टिकोन आणि लोककल्याणासाठी असलेले त्यांचे समर्पण, आजही आपल्याला प्रेरित करते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ मधील आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याला केले संबोधित
January 28th, 02:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केरळमधील आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी प्रत्येकाला भेटण्याचा योग आल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आर्य वैद्यशाळेने आयुर्वेदाचे जतन, संरक्षण आणि त्याला आधुनिक रुप देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे, आपल्या सव्वाशे वर्षांच्या प्रवासात या संस्थेने आयुर्वेदाला उपचारांची एक प्रभावी पद्धत म्हणून प्रस्थापित केले, असे ते म्हणाले. त्यांनी आर्य वैद्यशाळेचे संस्थापक, वैद्यरत्न पी.एस. वारियर यांच्या योगदानाचे स्मरण केले आणि आयुर्वेदाप्रति त्यांचा दृष्टिकोन आणि लोककल्याणासाठीची त्यांची निष्ठा आजही प्रेरणा देत आहे, असे सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री नारायण धर्म संघोम ट्रस्टच्या स्वामींची घेतली भेट
January 23rd, 04:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्कला येथील शिवगिरी मठातील श्री नारायण धर्म संघोम ट्रस्टशी संबंधित स्वामींची भेट घेतली.LDF and UDF have pushed Kerala into corruption, misgovernance and appeasement politics: PM Modi in Thiruvananthapuram
January 23rd, 11:47 am
Prime Minister Narendra Modi today addressed a massive public rally in Thiruvananthapuram, Kerala, where he expressed gratitude for the warm reception and overwhelming public enthusiasm. He said that every visit to Kerala fills him with affection and energy and noted that the atmosphere in Thiruvananthapuram reflected a renewed sense of hope and confidence for change in the state.Huge crowd turns up as PM Modi addresses rally in Thiruvananthapuram, Kerala
January 23rd, 11:43 am
Prime Minister Narendra Modi today addressed a massive public rally in Thiruvananthapuram, Kerala, where he expressed gratitude for the warm reception and overwhelming public enthusiasm. He said that every visit to Kerala fills him with affection and energy and noted that the atmosphere in Thiruvananthapuram reflected a renewed sense of hope and confidence for change in the state.केरळमधील तिरुवनंतपुरम येथे विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 23rd, 11:00 am
आज, केरळच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांना नवी गती मिळाली आहे. आजपासून केरळमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत झाली आहे आणि तिरुवनंतपुरमला देशातील एक प्रमुख स्टार्ट-अप हब बनवण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. आज, केरळमधून संपूर्ण देशासाठी गरिबांच्या कल्याणाशी संबंधित एक मोठी सुरुवात देखील होत आहे. आज पंतप्रधान स्वनिधी क्रेडिट कार्ड सुरु करण्यात आले आहे. याचा फायदा देशभरातील रस्त्यावरील विक्रेते आणि पदपथावर काम करणाऱ्यांना होईल. या सर्व विकास आणि रोजगार निर्मितीच्या योजनांसाठी मी केरळच्या जनतेचे आणि देशवासीयांचे खूप खूप अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, उद्घाटन केले आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवला.
January 23rd, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील तिरुवनंतपुरम येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, उद्घाटन केले आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवला. या प्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, केरळच्या विकासासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांना आज नवीन गती मिळाली आहे. केरळमधील रेल्वे संपर्कव्यवस्था आता अधिक मजबूत झाली असून तिरुवनंतपुरम शहराला एका प्रमुख स्टार्टअप केंद्रामध्ये रूपांतरित करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आज केरळमधून गरिबांच्या कल्याणासाठी एक मोठी राष्ट्रव्यापी योजना सुरु करण्यात आली. पीएम स्वनिधी क्रेडिट कार्डचे अनावरण करण्यात आले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. याचा फायदा देशभरातील पथविक्रेते, फेरीवाले आणि पदपथांवर काम करणाऱ्यांना होईल. या विकासकामांसाठी आणि रोजगार निर्मितीच्या उपक्रमांसाठी त्यांनी केरळ मधील लोकांचे आणि देशभरातील नागरिकांचे अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी रोजी केरळ दौ-यावर
January 22nd, 02:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी 2026 रोजी केरळला भेट देणार आहेत. तिरुवअनंतपुरममध्ये सकाळी 10:45 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि आरंभ करण्यात येईल. या कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधितही करतील.आसाममधील काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 18th, 11:30 am
हवामान थंड आहे, गावे दूर-दूर आहेत, तरीही जिथपर्यंत माझी नजर जाते तिथे लोकच लोक दिसत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला आहात, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आज पुन्हा काझीरंगाला येण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. साहजिकच माझ्या मागील भेटीच्या आठवणी मनात येत आहेत. दोन वर्षांपूर्वी काझीरंगामध्ये घालवलेले क्षण माझ्या आयुष्यातील अतिशय खास अनुभवांपैकी आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात मला रात्रभर मुक्काम करण्याची संधी मिळाली होती आणि दुसऱ्या दिवशी हत्ती सफारीदरम्यान या परिसराचे सौंदर्य मी अगदी जवळून अनुभवले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील कालियाबोर येथील रू 6950 कोटी रुपयांच्या काझीरंगा उन्नत मार्गिका प्रकल्पाचे भूमीपूजन केले
January 18th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील कालियाबोर येथील रू 6950 कोटी रुपयांच्या काझीरंगा उन्नत मार्गिका प्रकल्पाचे(राष्ट्रीय महामार्ग 715 च्या कालियाबोर- नूमालीगढ टप्प्याचे चौपदरीकरण) भूमी पूजन केले. यावेळी त्याना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले. काझीरंगाला आपण दुसऱ्यांदा भेट दिली असून 2 वर्षांपूर्वी दिलेल्या भेटीतील अनेक प्रसंग त्यांच्या स्मरणात कायम कोरले गेले आहेत असे त्यांनी म्हटले. काझीरंगा मध्ये रात्री मुक्काम करण्याची संधी मिळाली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हत्तीवरून केलेल्या सफरीत त्यांना जवळून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता आला होता याचा त्यांनी उल्लेख केला.The cruel TMC government does not allow central schemes to reach West Bengal: PM Modi in Malda
January 17th, 03:00 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a massive public rally in Malda, West Bengal, highlighting the pivotal role of Eastern India in shaping a Viksit Bharat by 2047. He underscored that Eastern India was long shackled by those who thrived on pisive politics, whereas the BJP has freed the region from such constraints.PM Modi draws huge crowd at Malda Rally in West Bengal
January 17th, 02:34 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a massive public rally in Malda, West Bengal, highlighting the pivotal role of Eastern India in shaping a Viksit Bharat by 2047. He underscored that Eastern India was long shackled by those who thrived on pisive politics, whereas the BJP has freed the region from such constraints.पंतप्रधानांचे तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मधील भाषण
November 19th, 07:01 pm
व्यासपीठावर उपस्थित तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एल मुरुगन जी, तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर के. रामासामी जी, निरनिराळ्या कृषी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आलेले सर्व मान्यवर आणि इतर सर्व लोकप्रतिनिधीवर्ग, माझे प्रिय शेतकरी बांधव आणि भगिनी तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्यासोबत सहभागी झालेले देशभरातील लाखो शेतकरी, त्यांनाही मी येथून वणक्कम म्हणतो, नमस्कार करतो आणि सगळ्यात आधी मी तुम्हा सर्वांची आणि देशभरातून जमलेल्या माझ्या शेतकरी बंधू-भगिनींची क्षमा मागतो. मला इथे येण्यासाठी जवळ जवळ एक तास उशीर झाला आहे, कारण मी आज पुट्टपर्थी इथे सत्य साई बाबांच्या कार्यक्रमात होतो, तिथला कार्यक्रम जरा जास्त वेळ लांबला, त्यामुळे मला यायला उशीर झाला, तुम्हा सर्वांची जी गैरसोय झाली, मला दिसते आहे की देशभरातील अनेक लोक इथे थांबून आहेत, याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 ला केले संबोधित
November 19th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी कोईम्बतूरच्या पवित्र भूमीवरील दैवत मरुदमलाईच्या भगवान मुरुगन यांना वंदनही केले.कोईम्बतूरचे ही संस्कृती, करुणाभाव आणि सर्जनशीलता यांची भूमी आहे असे त्यांनी सांगितले. हे शहर दक्षिण भारताच्या उद्योजकीय शक्तीचे एक ऊर्जा केंद्र असल्याचा दखलपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. इथले वस्त्रोद्योग क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. कोईम्बतूरचे माजी खासदार सी.पी. राधाकृष्णन हे आता उपराष्ट्रपती म्हणून देशाला मार्गदर्शन करत आहेत, यामुळे आता या शहराला आणखी महत्त्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा करणार दौरा
November 18th, 11:38 am
पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा दौरा करणार आहेत.नवी दिल्लीत सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानात पंतप्रधानांचे भाषण
November 17th, 08:30 pm
आज आपण सर्वजण अशा एका महान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यासाठी येथे जमलो आहोत, ज्यांनी भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकारिता, अभिव्यक्ती आणि लोकचळवळीच्या शक्तीला नवी उंची दिली. रामनाथजी यांनी एक दूरदर्शी म्हणून, एक संस्था निर्माते म्हणून, एक राष्ट्रवादी म्हणून आणि एक माध्यम अग्रणी म्हणून, इंडियन एक्सप्रेस समूहाला केवळ एक वृत्तपत्र नाही, तर एक मिशन म्हणून भारतातील लोकांसमोर स्थापित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह, भारताची लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय हितांचा आवाज बनला. म्हणूनच 21 व्या शतकातील या कालखंडात जेव्हा भारत विकसित होण्याचा संकल्प घेऊन पुढे जात आहे, तेव्हा रामनाथजी यांची बांधिलकी, त्यांचे प्रयत्न, त्यांची दूरदृष्टी आपल्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. मी इंडियन एक्सप्रेस समूहाचे आभार मानतो, त्यांनी मला या व्याख्यानासाठी आमंत्रित केले, मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानमध्ये मांडले आपले विचार
November 17th, 08:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत द इंडियन एक्सप्रेसने आयोजित केलेल्या सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. मोदी म्हणाले की, आज आपण अशा एका प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यासाठी एकत्र जमलो आहोत, ज्यांनी भारतातील लोकशाही, पत्रकारिता, अभिव्यक्ती आणि लोक चळवळींच्या शक्तीला नवी उंची दिली. रामनाथ गोएंका यांनी एक दूरदर्शी, संस्था निर्माते, राष्ट्रवादी आणि माध्यम नेते म्हणून, इंडियन एक्सप्रेस समूहाला केवळ एक वृत्तपत्र म्हणून नव्हे तर एक ध्येय म्हणून भारतातील लोकांमध्ये स्थापित केले. पंतप्रधानांनी नमूद केले की त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह भारताच्या लोकशाही मूल्यांचा आणि राष्ट्रीय हितांचा आवाज बनला. 21 व्या शतकाच्या या युगात, भारत विकसित होण्याच्या संकल्पाने पुढे जात असताना, रामनाथ गोएंका यांची वचनबद्धता, प्रयत्न आणि दूरदृष्टी खूप मोठी प्रेरणा स्रोत आहे यावर त्यांनी भर दिला. हे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी इंडियन एक्सप्रेस समूहाचे आभार मानले आणि उपस्थित सर्वांचे अभिनंदन केले.