पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात घेतले दर्शन
May 11th, 12:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथ मंदिराला भेट दिली. या मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर, भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, परमेश्वराचे आशीर्वाद मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.प्रभास पाटण, गुजरात येथील सोमनाथ अमृत महोत्सवात पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर
May 11th, 10:20 am
आज प्रभास पाटणचे हे पवित्र क्षेत्र एका अद्भुत तेजाने उजळून निघाले आहे. महादेवाचा हे साक्षात दर्शन, हे सौंदर्य, धरती आणि आसमंतातून झालेली पुष्पवृष्टी, भगव्या ध्वजांची ही छटा, कला, संगीत आणि नृत्याची अप्रतिम सादरीकरणे, वेदमंत्रांचा उच्चार, गर्भगृहात होणारा शिव पंचाक्षरीचा अखंड पाठ आणि या सर्वांसोबत सागराच्या लाटांचा जयघोष; असे वाटत आहे जणू ही सृष्टी एका सुरात बोलत आहे- जय सोमनाथ! जय-जय सोमनाथ!PM Modi participates in Somnath Amrut Mahotsav, marking 75 years since the inauguration of the restored Somnath Temple, Gujarat
May 11th, 10:15 am
Addressing the Somnath Amrut Mahotsav at Somnath Temple, PM Modi described the 75th anniversary of the temple’s reconstruction as a milestone in Bharat’s civilisational journey and a symbol of India’s enduring spiritual consciousness. He said Somnath reflects the nation’s resilience, cultural continuity and unwavering faith, while also highlighting the importance of preserving heritage alongside development and modern progress.केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर झालेला चारधाम यात्रेचा प्रारंभ याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले शुभचिंतन
April 22nd, 11:28 am
पंतप्रधानांनी आज देवभूमी उत्तराखंडमधील श्री केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या पवित्र प्रसंगी श्रद्धापूर्वक आदर व्यक्त केला. यासोबतच यंदाच्या चारधाम यात्रेचा प्रारंभही झाला. पंतप्रधानांनी उत्तराखंड येथे यात्रेच्या निमित्ताने जाणाऱ्या सर्व भाविकांना पत्र लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच त्यांच्या क्षेमकल्याणासाठी प्रार्थना केली आहे.The Dehradun-Delhi Economic Corridor will transform the entire region: PM Modi in Uttarakhand
April 14th, 01:25 pm
PM Narendra Modi inaugurated the Delhi-Dehradun Economic Corridor in Dehradun. In his address, he detailed the transformative benefits of the corridor and highlighted the project's multi-dimensional impact on the region. He also spoke about the construction of a nearly 12-kilometre elevated wildlife corridor as part of the expressway and urged tourists and pilgrims to keep sacred spaces clean and plastic-free.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिकेचे उद्घाटन
April 14th, 01:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिकेचे उद्घाटन केले. उत्तराखंड आणि विस्तारित क्षेत्राच्या विकासात हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. देहरादून इथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांनी बैसाखी, बोहाग बिहू आणि पुथांडू या सणांच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. देशभरात सध्या सणांचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.मन की बात फेब्रुवारी 2026
February 22nd, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे, शुभेच्छा आहेत. (अभिनंदन आहे.) मन की बात हे देशाच्या आणि देशवासियांच्या कार्यकर्तृत्वाला (उपलब्धी) सर्वांसमोर आणण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ आहे. नुकत्याच दिल्लीत संपन्न झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देशाने अशीच एक उपलब्धी पाहिली. अनेक देशांतील नेते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, नवोन्मेषक आणि स्टार्ट अप क्षेत्राशी संबंधित लोक, एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारत मंडपम मध्ये एकत्र आले होते. आगामी एआय च्या शक्तीचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दृष्टीने ही शिखर परिषद एक महत्त्वाचे वळण ठरली.उत्तराखंडच्या स्थापनच्या रौप्य महोत्सवानिमित्त निमत्त डेहराडून इथल्या समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा
November 09th, 01:00 pm
9 नोव्हेंबरचा हा दिवस एका दीर्घ तपस्येचे फळ आहे. आजचा दिवस आपण सर्वांसाठी अभिमानाची अनुभूती देणारा आहे. उत्तराखंडच्या देवतुल्य जनतेने अनेक वर्षांपासून जे स्वप्न पाहिले होते, ते अटलजींच्या सरकारच्या काळात, 25 वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते, आणि आता गेल्या 25 वर्षांच्या प्रवासानंतर, आज उत्तराखंड ज्या उंचीवर पोहचले आहे, ते पाहून त्या प्रत्येक व्यक्तीला आनंद होणे स्वाभाविक आहे, ज्यांनी या सुंदर राज्याच्या निर्मितीसाठी संघर्ष केला होता. ज्यांचे पर्वतांवर प्रेम आहे, ज्यांना उत्तराखंडची संस्कृती, इथले नैसर्गिक सौंदर्य, देवभूमीच्या लोकांशी जिव्हाळा आहे, त्यांचे मन आज प्रफुल्लित आहे, ते आनंदित आहेत.डेहराडून येथे उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
November 09th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडूनमध्ये उत्तराखंडच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान , पंतप्रधानांनी 8140 कोटी रुपये मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन केले. या समारोहाला संबोधित करताना, मोदी यांनी देवभूमी उत्तराखंडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांप्रती आदर, सन्मान आणि सेवाभाव व्यक्त केला.श्री नारायण गुरु आणि गांधीजी यांच्यातील संवादाच्या शताब्दीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 24th, 11:30 am
आज हा परिसर देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व घटनेचे स्मरण करण्याचा साक्षीदार होतो आहे. ती एक अशी ऐतिहासिक घटना होती, ज्या घटनेने आपल्या स्वातंत्र्य चळवळीला केवळ एक नवीन दिशा दिली नाही तर स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाला, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला ठोस अर्थ दिला. शंभर वर्षांपूर्वीची श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांची ती भेट आजही तितकीच प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे. शंभर वर्षांपूर्वी झालेली ती भेट आजही सामाजिक सौहार्द आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक मोठा स्रोत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, मी श्री नारायण गुरुंच्या चरणी प्रणाम करतो. गांधीजींनाही मी आदरांजली वाहतो.श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
June 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला संबोधित केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आदरपूर्वक अभिवादन केले आणि सांगितले की आज हे ठिकाण देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार आहे. आपल्या स्वातंत्र्यचळवळीला नवी दिशा देणारी ही एक ऐतिहासिक घटना होती, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला आणि स्वातंत्र्याच्या उद्दिष्टांना तिने ठोस अर्थ दिला,असे त्यांनी सांगितले. श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यात 100 वर्षांपूर्वी झालेली ही भेट आजही प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे, आणि सामाजिक सलोखा आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या ऐतिहासिक प्रसंगी, त्यांनी श्री नारायण गुरूंच्या चरणी वंदन केले आणि महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे विझिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 02nd, 02:06 pm
आज भगवान आदि शंकराचार्य जी यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात आदि शंकराचार्य यांच्या जन्मभूमीला भेट देण्याचे सद्भाग्य मला लाभले होते. काशी या माझ्या लोकसभा मतदारसंघात विश्वनाथ धाम परिसरात आदि शंकराचार्य जी यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे याचा मला आनंद आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्य यांच्या दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य देखील मला लाभले आहे. आणि आजच देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे द्वार दर्शनासाठी उघडले आहे, केरळमधून बाहेर पडून देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठांची स्थापना करून आदि शंकराचार्य जी यांनी राष्ट्रीय चैतन्याची जाणीव जागृत केली. या पवित्र प्रसंगी मी त्यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो.केरळमध्ये 8,800 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विझिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
May 02nd, 01:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे 8,800 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विझिंजम खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय सागरी बंदराचे लोकार्पण केले. भगवान आदि शंकराचार्य यांच्या जयंतीदिनाच्या मंगल प्रसंगी कार्यक्रमासाठी जमलेल्या उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात आदि शंकराचार्य यांच्या वंदनीय जन्मस्थानाला भेट देण्याचा सन्मान प्राप्त झाल्याची आठवण सांगितली. काशी या पंतप्रधानांच्या लोकसभा मतदारसंघात आदि शंकराचार्य यांचा भव्य पुतळा उभारण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हा पुतळा म्हणजे आदि शंकराचार्य यांची प्रचंड अध्यात्मिक विद्वत्ता आणि शिकवण यांच्याप्रती आदरांजली प्रतीक आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपल्याला उत्तराखंडातील पवित्र केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्य यांच्या दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचा सन्मान देखील प्राप्त झाला आहे. केदारनाथ मंदिराची कवाडे आज भाविकांसाठी खुली झाल्यामुळे, आजच्या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मुळचे केरळचे असलेल्या आदि शंकराचार्य यांनी देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठांची स्थापना करून राष्ट्रीय चैतन्याची जाणीव जागृत केली, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आदि शंकराचार्य यांच्या प्रयत्नांनी एकसंघ आणि अध्यात्मिकदृष्ट्या जागृत भारताच्या उभारणीचा पाया रचला यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.उत्तराखंड राज्यात हर्शील येथे आयोजित हिवाळी पर्यटन कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 06th, 02:07 pm
येथील उर्जावंत मुख्यमंत्री, माझे धाकटे बंधू पुष्कर सिंह धामी जी, केंद्रीय मंत्री श्री अजय टामटा जी, राज्याचे मंत्री सतपाल महाराज जी, संसदेतील माझे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट जी, संसदेतील माझ्या सहकारी माला राज्यलक्ष्मी जी, आमदार सुरेश चौहान जी, सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो….पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील हर्षील इथे आयोजित हिवाळी पर्यटन कार्यक्रमाला केले संबोधित
March 06th, 11:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील हर्षील इथे आयोजित ट्रेक आणि बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ते तिथल्या हिवाळी पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी झाले. यावेळी त्यांनी मुखवा येथील माता गंगेच्या हिवाळी बैठकीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चना ही केली. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी माणा गावातील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि या दुर्घटनेत ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदनाही व्यक्त केल्या. या संकटकाळात संपूर्ण राष्ट्र त्यांच्या कुटुंबियांसोबत एकत्र उभे आहे, या सोबतीमुळे पिडीत कुटुंबांना प्रचंड बळ मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम - पर्वतमाला परियोजनेअंतर्गत उत्तराखंड राज्यातील सोनप्रयाग ते केदारनाथ (12.9 किमी) पर्यंतच्या रोपवे प्रकल्पाच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
March 05th, 03:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) सोनप्रयाग ते केदारनाथ (12.9 किमी) पर्यंत 12.9 किमी रोपवे प्रकल्पाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (डीबीएफओटी) अर्थात संरचना, बांधकाम, वित्तपुरवठा, कार्यान्वयन आणि हस्तांतरण पद्धतीने विकसित केला जाईल आणि यासाठी एकूण 4,081.28 कोटी रुपये भांडवली खर्च येईल.पंतप्रधान 6 मार्च रोजी उत्तराखंडला देणार भेट
March 05th, 11:18 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 6 मार्च रोजी उत्तराखंडला भेट देणार आहेत.सकाळी 9:30 च्या सुमारास ते मुखवा या हिवाळा ऋतूतील वास्तव्यस्थानी गंगामातेची पूजा करून दर्शन घेतील.सकाळी सुमारे 10:40 वाजता, ते एका ट्रेक आणि बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील आणि हरसिलमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत उपस्थितांना संबोधित करतील.इंडोनेशिया, जकार्ता येथील श्री सनातन धर्म आलायम यांच्या महा कुंभाभिशेगम दरम्यान पंतप्रधानांचे संबोधन
February 02nd, 02:45 pm
काहीच दिवसांपुर्वी 140 कोटी भारतीयांचे प्रेम सोबत घेऊन राष्ट्रपती प्रबोवो भारतातून परतले आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना प्रत्येक भारतीयाने दिलेल्या शुभेच्छा जाणवत असतील याची मला खात्री आहे.इंडोनेशियात जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभाभिषेगमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
February 02nd, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातील जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभभिषेगमला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. त्यांनी महामहिम, अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, मुरुगन टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष पा हाशिम, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. कोबलन, तमिळनाडू आणि इंडोनेशियाचे मान्यवर, पुजारी आणि आचार्य, भारतीय वंशाचे सदस्य, या शुभ प्रसंगाचा भाग असलेले इंडोनेशिया आणि इतर देशातील नागरिक तसेच ज्या प्रतिभावान कलाकारांमुळे हे दैवी आणि भव्य मंदिर प्रत्यक्षात आले त्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.The National Games are a celebration of India's incredible sporting talent: PM Modi in Dehradun
January 28th, 09:36 pm
PM Modi during the 38th National Games inauguration in Dehradun addressed the nation's youth, highlighting the role of sports in fostering unity, fitness, and national development. He emphasized the government's efforts in promoting sports, the importance of sports infrastructure, and India's growing sports economy.