आसाममधील राष्ट्रीय महामार्ग क्र.715 च्या कालीबोर-नुमालीगड विभागातील महामार्गाचे चौपदरीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 01st, 03:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने राष्ट्रीय महामार्ग -715 च्या कालीबोर-नुमालीगड विभागातील विद्यमान कॅरेजवेचे चौपदरी रुंदीकरणाला मंजुरी दिली. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पट्ट्यातील प्रस्तावित वन्यजीव अनुकूल उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा यात समावेश आहे. हा प्रकल्प अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धतीने विकसित केला जाणार असून, त्याची एकूण लांबी 85.675 किमी आहे, आणि त्यासाठी एकूण 6957 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.स्वावलंबन हा 2047 पर्यंत विकसित भारताकडे नेणारा मार्ग: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 27th, 11:30 am
‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या हृदयामध्ये जणू एक आनंदाची लाट उसळली. संपूर्ण देशाला शुभांशू यांच्या कामगिरीविषयी अभिमान वाटला. अशावेळी मला एका घटनेचं स्मरण होत आहे. ज्यावेळी ऑगस्त 2023 मध्ये चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले, त्यावेळीही देशामध्ये अशाच प्रकारचे अनोखे वातावरण तयार झाले होते. विज्ञानापासून ते अंतराळापर्यंतच्या विषयांमध्ये अगदी लहान-लहान मुलांमध्येही एक नवीन जिज्ञासा, उत्सुकता जागृत झाली होती. आता लहान-लहान मुलेही म्हणताहेत की, आम्हीही अंतराळामध्ये जाणार! आम्हीही चंद्रावर जाणार, अंतराळ संशोधक बनणार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम, गुवाहाटी मध्ये झुमोईर बिनंदिनी कार्यक्रमात केलेले भाषण
February 24th, 06:40 pm
आसामचे राज्यपाल श्री लक्ष्मण प्रसाद आचार्यजी ऊर्जावान मुख्यमंत्री हेमंत बिस्वा जी, केंद्र सरकारातील माझे साथीदार डॉ. एस जयशंकर, सर्बानंद सोनोवाल, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, इतर मंत्री, खासदार, आमदार, सर्व कलाकार साथी आणि आसामच्या माझ्या बंधु भगिनींनो ..पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये गुवाहाटीत झुमर बिनंदिनी कार्यक्रमात झाले सहभागी
February 24th, 06:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामध्ये गुवाहाटी येथे झुमर बिनंदिनी 2025 या भव्य झुमर कार्यक्रमात सहभागी झाले. या समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की या ठिकाणी सर्वत्र ऊर्जा, उत्साह आणि रोमांचाने भरून गेलेले नादमाधुर्याचे वातावरण आहे. झुमरमधील सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम तयारी केली आहे ज्यामधून चहाच्या मळ्यांचा सुगंध आणि सौंदर्य प्रतिबिंबित होत आहे,असे त्यांनी नमूद केले. झुमर आणि चहाच्या मळ्यांची संस्कृती यांच्याशी ज्या प्रकारे येथील लोकांचे विशेष नाते आहे, तशाच प्रकारचे आपलेही नाते आहे, असे त्यांनी सांगितले. इतक्या मोठ्या संख्येने आज झुमर नृत्यात सहभागी झालेले कलाकार एक विक्रम प्रस्थापित करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली 2023 मध्ये आपण आसामला दिलेल्या भेटीच्या वेळी बिहू नृत्यात 11,000 कलाकार सहभागी झाले होते याची आठवण करून देत पंतप्रधानांनी सांगितले की कधीही विसरता येणार नाहीत अशा त्या आठवणी होत्या आणि यावेळी देखील तशाच प्रकारचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण असेल, अशी आपल्याला अपेक्षा आहे. अतिशय मनोहारी सांस्कृतिक सादरीकरणाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आसाम सरकार आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. या आनंदोत्सवात चहाच्या मळ्यातील कामगार समुदाय आणि आदिवासी जनता सहभागी होत असल्याने आजचा दिवस आसामसाठी अतिशय अभिमानाचा दिवस असेल असे त्यांनी नमूद केले. या विशेष दिनाच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.जागतिक गेंडा दिनानिमित्त गेंड्यांच्या संरक्षणाविषयीच्या बांधिलकीचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार
September 22nd, 12:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गेंडा दिनानिमित्त गेंड्यांच्या संरक्षणाविषयीच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला आहे. त्यांनी नागरिकांना भारतातील एक शिंगी गेंड्यांचा मोठ्या प्रमाणावर अधिवास असणाऱ्या आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्याला भेट देण्याचे आवाहन केले.आसाममधील जोरहट येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 09th, 01:50 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनवाल जी, रामेश्वर तेली जी, आसाम सरकारचे सर्व मंत्री, उपस्थित लोकप्रतिनिधी, इतर प्रतिष्ठित आणि आसामचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो!! आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित राहिले आहात, त्याबद्दल मी अगदी नतमस्तक होवून आपल्याला वंदन करतो आणि तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो.पंतप्रधानांनी आसाममधील जोरहाट येथे 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन , लोकार्पण आणि पायाभरणी
March 09th, 01:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील जोरहाट येथे 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये आरोग्य, तेल आणि वायू, रेल्वे आणि गृहनिर्माण या क्षेत्रांचा समावेश आहे.पंतप्रधानांनी दिली काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट
March 09th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी आसाममधील युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. नागरिकांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यावी आणि तिथल्या असामान्य नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घ्यावा असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले. यावेळी त्यांनी या ठिकाणाच्या संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर असलेल्या वन दुर्गा या महिला वनरक्षकांच्या पथकासोबत संवाद साधला आणि या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी त्यांची बांधिलकी आणि धैर्याची प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी यांनी लखीमाई, प्रद्युम्न आणि फूलमाई या हत्तींना ऊस भरवतानाची काही छायाचित्रे देखील सामाईक केली.Prime Minister Narendra Modi to visit Assam, Arunachal Pradesh, West Bengal and Uttar Pradesh
March 08th, 04:12 pm
Prime Minister will visit Assam, Arunachal Pradesh, West Bengal and Uttar Pradesh on 8th-10th March, 2024