उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग-19 आणि वाराणसी रिंग रोड दरम्यान NH (O) अंतर्गत 14447.64 कोटी रुपयांच्या एकूण भांडवली खर्चासह 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' नुसार 6 पदरी 'ग्रीनफील्ड' उन्नत मार्गिका, रॅम्प्स/लूप्स आणि पादचारी पुलाच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
July 15th, 04:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग-19 आणि वाराणसी रिंग रोड दरम्यान एका 'लिंक/कनेक्टर कॉरिडॉर'च्या विकासाला मंजुरी दिली आहे. याद्वारे गंगा नदीच्या किनाऱ्यालगत कनेक्टिव्हिटी साधली जाईल. 46.039 किमी लांबीच्या या प्रकल्पामध्ये सहा-पदरी उन्नत मुख्य मार्ग, एक शानदार 'केबल-स्टेड' पूल, 'एक्स्ट्राडोज्ड' पादचारी पूल-सह-प्रमुख पूल (Foot Over Bridge-cum-Major Bridge), लूप्स, रॅम्प्स, लिंक रोड आणि सर्व्हिस रोड यांचा समावेश आहे. हा प्रकल्प 'हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल' अंतर्गत आणि NH(O) योजनेद्वारे एकूण 14,447.64 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चासह पूर्ण केला जाईल. या खर्चात 6,037.85 कोटी रुपयांचा स्थापत्य बांधकाम खर्च (ज्यात युटिलिटी शिफ्टिंगचा समावेश आहे, परंतु जीएसटीचा समावेश नाही) आणि 541.11 कोटी रुपयांचा भूसंपादन खर्च समाविष्ट आहे.पंतप्रधान 28-29 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर
April 26th, 03:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28-29 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. 28 एप्रिल रोजी संध्याकाळी साधारण 5 वाजता, पंतप्रधान महिला संमेलनामध्ये सहभागी होतील. येथे ते वाराणसीमधील सुमारे ₹6,350 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.