DMK is the biggest enemy of Tamil Nadu’s culture: PM Modi in Madhuranthakam
January 23rd, 03:15 pm
PM Modi addressed a public rally in Madhuranthakam, Tamil Nadu, where he said the people of the state had given the DMK a clear mandate twice, but the party betrayed the trust of the people. He added DMK made many promises but delivered zero results, adding that people are now calling it a CMC government, one that promotes corruption, mafia, and crime.Tamil Nadu shows massive support for NDA at PM Modi’s Madhuranthakam rally
January 23rd, 03:00 pm
PM Modi addressed a public rally in Madhuranthakam, Tamil Nadu, where he said the people of the state had given the DMK a clear mandate twice, but the party betrayed the trust of the people. He added DMK made many promises but delivered zero results, adding that people are now calling it a CMC government, one that promotes corruption, mafia, and crime.नवी दिल्ली येथे पोंगल सणानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 14th, 11:00 am
आज, पोंगल हा एक जागतिक सण झाला आहे. जगभरातील तमिळ समुदाय आणि तमिळ संस्कृतीवर प्रेम करणारे लोक तो उत्साहाने साजरा करतात आणि त्यापैकी मीदेखील एक आहे. हा विशेष सण तुम्हा सर्वांसोबत साजरा करणे, माझ्यासाठी भाग्याचे आहे. आपल्याकडे तमिळ जीवनात पोंगल हा एक आनंददायी अनुभव आहे. हा सण आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीप्रती, पृथ्वी आणि सूर्याप्रती कृतज्ञतेचे प्रतीक आहे.त्याचसोबत हा सण आपल्याला निसर्ग, कुटुंब आणि समाज यांच्यात संतुलन साधण्याचा मार्गदेखील दर्शवतो. देशाच्या विविध भागात लोहडी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि इतर सणांचा देखील उत्साह आहे. मी भारतातील आणि जगभरातील माझ्या सर्व तमिळ बंधू आणि भगिनींना पोंगल आणि सर्व सणांच्या हार्दिक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे पोंगल सोहळ्याला केले संबोधित
January 14th, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पोंगल सोहळ्याला संबोधित केले. तमिळ भाषेत शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, “आज पोंगल हा एक जागतिक सण बनला आहे”, जो जगभरातील तमिळ समुदायांद्वारे आणि तमिळ संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या लोकांद्वारे उत्साहाने साजरा केला जातो, आणि आपण देखील त्यापैकीच एक आहेत. हा विशेष सण सर्वांसोबत साजरा करणे हे आपले भाग्य आहे, असे त्यांनी सांगितले. तमिळ जीवनात पोंगल हा एक सुखद अनुभव आहे, जो शेतकऱ्यांच्या कष्टाबद्दल, पृथ्वीबद्दल आणि सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, तसेच निसर्ग, कुटुंब आणि समाजात संतुलन राखण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या काळात देशाच्या विविध भागांमध्ये लोहरी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि इतर सणांच्या उत्साहात लोक रमले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी भारतातील आणि जगभरातील सर्व तमिळ बंधू-भगिनींना पोंगलच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच इतर सर्व सणांसाठी शुभेच्छा दिल्या.Hosting a national volleyball competition is an important step in placing Kashi on India’s sporting map: PM Modi
January 04th, 01:00 pm
PM Modi inaugurated the 72nd National Volleyball Tournament in Varanasi via video conferencing, welcoming players from 28 states and showcasing the spirit of Ek Bharat, Shreshtha Bharat. He highlighted Varanasi’s deep-rooted sporting tradition and expressed confidence that players would feel the city’s enthusiasm, support, and renowned hospitality during the championship.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाराणसी येथे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे केले उद्घाटन
January 04th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले. या प्रसंगी मोदी यांनी वाराणसीचे खासदार म्हणून सर्व खेळाडूंचे स्वागत करताना आणि त्यांचे अभिनंदन करताना होणारा विशेष आनंद व्यक्त केला. राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा आजपासून वाराणसीमध्ये सुरू होत असल्याचे त्यांनी घोषित केले. सर्व खेळाडू प्रचंड मेहनतीनंतर या राष्ट्रीय स्पर्धेत पोहोचले आहेत आणि येत्या काही दिवसांत वाराणसीच्या मैदानावर त्यांच्या प्रयत्नांची कसोटी लागणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले . देशातील 28 राज्यांचे संघ येथे एकत्र आले असून यामधून 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चे सुंदर चित्र सादर होत आहे, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी स्पर्धेमधील सर्व सहभागींचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 28th, 11:30 am
2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगमम साठी दिल्या हार्दिक शुभेच्छा
December 02nd, 07:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पासून सुरु झालेल्या काशी तमिळ संगमम साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा चैतन्यदायी कार्यक्रम 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेला अधिक दृढ करतो. संगमम मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला काशी मध्ये प्रसन्न आणि संस्मरणीय वास्तव्याचा लाभ होवो, अशा मी शुभेच्छा देतो.जेनझीने वाहून नेला केटीएस-4.0 चा सांस्कृतिक रथ- तमिळनाडू ते काशीपर्यंत प्रवासाचे युवकांनी आनंदयात्रेत केले रुपांतर
November 30th, 06:56 pm
काशी तमिळ संगमम् 4.0 या महोत्सवाच्या 2 डिसेंबर पासून होत असलेल्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर त्यासाठी सज्ज होत असलेल्या जेन झी म्हणजे डिजिटल युगात जन्माला आलेल्या युवा पिढीमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. काशी आणि तमिळनाडू यांच्यातील प्राचीन सांस्कृतिक आणि भाषिक बंधांना तरुण पिढीच्या उत्साही ऊर्जेशी जोडणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.मन की बात’ हे देशातील लोकांच्या सामुहिक प्रयत्नांना सामान्य जनतेसमोर आणणारं एक उत्तम व्यासपीठ : पंतप्रधान मोदी
November 30th, 11:30 am
या महिन्याच्या मन की बातमध्ये, पंतप्रधान मोदींनी संविधान दिन सोहळा, वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन, अयोध्येत धर्मध्वजारोहण, आयएनएस 'माहे'चा नौदलात समावेश आणि कुरुक्षेत्र येथे झालेला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव यासह नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांवर प्रकाश टाकला. देशात यंदा झालेले अन्नधान्याचे आणि मधाचे विक्रमी उत्पादन, भारताचे क्रीडा क्षेत्रातील यश, संग्रहालये आणि नैसर्गिक शेती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला. पंतप्रधानांनी सर्वांना काशी-तमिळ संगमचा भाग होण्याचेही आवाहन केले.नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 31st, 07:00 pm
सर्वप्रथम, मला यायला विलंब झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आज सरदार साहेबांची 150 वी जयंती आहे. एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे त्याचा विशेष कार्यक्रम होता, त्यामुळे मला उशीर झाला आणि मी वेळेवर पोहोचू शकलो नाही, आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मी इथे आलो, त्यावेळी जे मंत्र ऐकले होते, त्यांची ऊर्जा आपल्याला आताही जाणवत आहे. जेव्हा जेव्हा मला तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळते, आणि जेव्हा जेव्हा मी येतो, तेव्हा तो एक दिव्य अनुभव असतो, एक अद्भुत अनुभव असतो. आणि हा स्वामी दयानंदजींचा आशीर्वाद आहे, त्यांच्या आदर्शांबद्दल आपल्या सर्वांना आदर आहे, तुम्हा सर्व विचारवंतांशी माझी अनेक दशकांची जवळीक आहे, त्यामुळे मला तुमच्यामध्ये पुन्हा पुन्हा येण्याची संधी मिळते. आणि जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटतो, तुमच्याशी संवाद साधतो, तेव्हा मला एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच प्रेरणा मिळते. आणि मला नुकतेच सांगण्यात आले की अशी आणखी नऊ सभागृहे बांधण्यात आली आहेत. तेथे आपले सर्व आर्य समाज सदस्य हा कार्यक्रम व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून पाहत आहेत. मी त्यांना पाहू शकत नाही, पण मी इथूनच त्यांना प्रमाण करतो.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात दिलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
October 31st, 09:00 am
सरदार पटेल यांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीच्या या ऐतिहासिक दिवशी, एकता नगरची ही दिव्य प्रभात , हे विहंगम दृश्य, सरदार साहेबांच्या चरणांशी आमची उपस्थिती, आज आपण सर्व जण एका महान क्षणाचे साक्षीदार आहोत. देशभरात आयोजित एकता दौड, रन फॉर युनिटी , कोट्यवधी भारतीयांचा उत्साह, नूतन भारताच्या संकल्पशक्तीचा आपणा सर्वाना साक्षात्कार होतो आहे. नुकतेच इथे जे कार्यक्रम झाले, काल संध्याकाळी जे अद्भुत सादरीकरण झाले, त्यांच्यातही भूतकाळातील परंपरा होती, वर्तमानातील श्रम व शौर्य होते, आणि भविष्यकाळातील सिद्धतेची झलकही होती. सरदार साहेबांच्या एकशेपन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ विशेष नाणे आणि विशेष टपाल तिकिटदेखील जारी केले गेले आहे. मी सर्व 140 कोटी देशवासियांना सरदार साहेबांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केले
October 31st, 08:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित केले. सरदार पटेल यांची 150 वी जयंती हा ऐतिहासिक सोहळा असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. एकता नगरमधील सकाळ दिव्य असून इथले विहंगम दृश्य विस्मयकारक असल्याचे सांगून मोदी यांनी सरदार पटेल यांच्या चरणी सामूहिक उपस्थिती असल्याचा उल्लेख केला आणि देश आज एका महत्त्वाच्या क्षणाचा साक्षीदार होत असल्याचे सांगितले. त्यांनी देशव्यापी एकता दौड आणि कोट्यवधी भारतीयांच्या उत्साहपूर्ण सहभागाचा उल्लेख केला, आणि नव्या भारताचा संकल्प प्रत्यक्षात साकारत असल्याचे अधोरेखित केले. यापूर्वी झालेल्या कार्यक्रमांचा आणि आदल्या संध्याकाळी झालेल्या उल्लेखनीय सादरीकरणाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की यामधून भूतकाळातील परंपरा, वर्तमानातील श्रम आणि शौर्य तसेच भविष्यातील कामगिरीची झलक प्रतिबिंबित होत आहे. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीच्या स्मृती प्रीत्यर्थ एक नाणे आणि विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशातील सर्व 140 कोटी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.Our government is working with full strength to transform the lives of farmers: PM Modi in Varanasi
August 02nd, 11:30 am
In his address while launching multiple development works in Varanasi, PM Modi said that this was his first visit to the holy city following Operation Sindoor. He asserted that during Operation Sindoor, the world witnessed the Rudra form of India. The PM announced that ₹21,000 crore had been transferred to the bank accounts of 10 crore farmers across the country under the PM-Kisan Samman Nidhi scheme.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन
August 02nd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर वाराणसीतील कुटुंबांना भेटल्याबद्दल मनस्वी भावना व्यक्त केल्या. वाराणसीतील लोकांशी असलेल्या त्यांच्या घट्ट भावनिक संबंधावर भर देत, मोदींनी शहरातील आपल्या प्रत्येक कौटुंबिक सदस्याविषयी आदरपूर्वक सद्भावना व्यक्त केली. मोदींनी श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर देशभरातील शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.तामिळनाडूतील गंगईकोंडा चोलपुरम मंदिरात आदि तिरुवथिराई महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 27th, 12:30 pm
परम आदरणीय अधिनस्थ मठाधीशगण, चिन्मया मिशनचे स्वामीगण, तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवि जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ. एल मुरुगन जी, स्थानिक खासदार थिरुमा-वलवन जी, मंचावर उपस्थित तामिळनाडूचे मंत्री, संसदेतील माझे सहकारी आदरणीय इलैयाराजा जी, सर्व ओदुवार, भक्त, विद्यार्थी, सांस्कृतिक इतिहासकार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ! नमः शिवायपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील गंगैकोंड चोळपुरम येथे आदि थिरुवादिरई महोत्सवाला केले संबोधित
July 27th, 12:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील गंगैकोंड चोळपुरम मंदिरात झालेल्या आदि थिरुवादिरई महोत्सवाला संबोधित केले. सर्वशक्तिमान भगवान शिव यांना त्यांनी वंदन केले. इलायराजा यांच्या संगीताच्या आणि ओदुवार यांच्या पवित्र मंत्रोच्चाराच्या साथीने, राजराजा चोल यांच्या पवित्र भूमीत दिव्य शिवदर्शनातून अनुभवायला मिळालेल्या गहन आध्यात्मिक ऊर्जेचे त्यांनी स्मरण केले. या आध्यात्मिक वातावरणामुळे आपले मन भारले गेल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.Today, with our efforts, we are taking forward the vision of a developed Tamil Nadu and a developed India: PM Modi in Thoothukudi
July 26th, 08:16 pm
PM Modi launched development projects worth ₹4,800 crore in Thoothukudi, spanning ports, railways, highways, and clean energy. He inaugurated the new ₹450 crore airport terminal, raising annual capacity from 3 to 20 lakh. Emphasising Tamil Nadu’s role in Make in India, he said the India–UK FTA will boost opportunities for youth, MSMEs, and strengthen regional growth.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूमधील तुतिकोरिन इथे 4,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण
July 26th, 07:47 pm
यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. चार दिवसांच्या परदेश दौऱ्यानंतर थेट भगवान रामेश्वराच्या पवित्र भूमीवर पोहोचणे, हे आपले भाग्य असल्याचे ते म्हणाले. त्यांनी परदेश दौऱ्यादरम्यान भारत आणि ब्रिटन दरम्यान झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराबद्दलही उपस्थितांना सांगितले. ही प्रगती भारताबद्दल वाढत असलेल्या जागतिक विश्वासार्हतेचे आणि राष्ट्राच्या नव्या आत्मविश्वासाचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. हाच आत्मविश्वास विकसित भारत आणि विकसित तामिळनाडूच्या निर्मितीला चालना देईल असे त्यांनी नमूद केले. आज भगवान रामेश्वर आणि भगवान तिरुचेंदूर मुरुगन यांच्या आशीर्वादाने तुतिकोरिनमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे, असेही त्यांनी सांगितले. 2014 मध्ये तामिळनाडूला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम तुतिकोरिनमध्ये आजही सुरू आहे, असे पंतप्रधान म्हणाले.उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे विविध प्रकल्पांचा शिलान्यास आणि नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 11th, 11:00 am
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, उपस्थित असलेले मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, बनास दुग्धालयाचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी आणि येथे इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आलेले माझे सर्व कुटुंबिय,