तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर
September 28th, 12:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या प्रत्येकाच्या वारसांना आज पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधी मधून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. जखमींना सहाय्यापोटी 50,000 रुपये देण्यात येणार आहेत.