कार्तिक पौर्णिमा आणि देवदिवाळीनिमित्त सर्वांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
November 05th, 10:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना कार्तिक पौर्णिमा आणि देवदिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला हा दिव्य सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, शांती, आरोग्य, आणि समृद्धी घेऊन येवो. मंगलस्नान, दानधर्म, आरती आणि प्रार्थनांशी जोडलेल्या आपल्या पवित्र परंपरेने प्रत्येकाचे आयुष्य उजळून जाओ ! असे पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.