राजस्थानमधील बिकानेर येथे विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 22nd, 12:00 pm
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीयुत भजन लाल जी, माजी मुख्यमंत्री भगिनी वसुंधरा राजे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, अर्जुन राम मेघवाल जी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी जी, प्रेमचंद जी, राजस्थान सरकारमधील अन्य मंत्रीगण, संसदेतील माझे सहकारी मदन राठौर जी, अन्य खासदार आणि आमदारगण, आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधल्या बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले
May 22nd, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना, त्यांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांचे स्वागत केले आणि 18 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून ऑनलाईनरित्या लक्षणीय संख्येने उपस्थित असलेल्या लोकांचे कौतुक केले. त्यांनी अनेक राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीकडे लक्ष वेधले. देशभरातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेल्या सर्व मान्यवर आणि नागरिकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी राजस्थानला भेट देणार
May 20th, 01:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी राजस्थानला भेट देणार आहेत. आपल्या राजस्थान भेटीत ते सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला बिकानेर इथे पोहोचतील आणि देशनोक इथल्या करणी माता मंदिरात दर्शन घेतील.