पंतप्रधानांनी महामहीम प्रिन्स करीम आगाखान IV यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
February 05th, 04:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महामहीम प्रिन्स करीम आगा खान IV यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी त्यांना एका दूरदर्शी नेत्याच्या रूपात गौरवले, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सेवा आणि आध्यात्मिकतेसाठी समर्पित केले. तसेच, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास आणि महिलांच्या सक्षमीकरणासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची प्रशंसा केली.