पंतप्रधानांची अफ्स्लाउटडाइक धरणाला भेट
May 17th, 03:38 pm
या भेटीद्वारे नाविन्यपूर्ण जलव्यवस्थापन उपाययोजना, हवामान लवचिकता आणि शाश्वत पायाभूत सुविधांप्रति दोन्ही देशांची सामायिक बांधिलकी अधोरेखित झाली. 32 किलोमीटर लांबीचे अफ्स्लाउटडाइक धरण आणि मार्गिका ही पूरनियंत्रण आणि भूमी सुधारणा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आदर्श संरचना मानली जाते. ही संरचना नेदरलँड्सच्या मोठ्या भूभागाचे उत्तर समुद्रापासून संरक्षण करते तसेच गोड्या पाण्याच्या साठवणीलाही सक्षम करते.