आसाममधील राष्ट्रीय महामार्ग क्र.715 च्या कालीबोर-नुमालीगड विभागातील महामार्गाचे चौपदरीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

October 01st, 03:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने राष्ट्रीय महामार्ग -715 च्या कालीबोर-नुमालीगड विभागातील विद्यमान कॅरेजवेचे चौपदरी रुंदीकरणाला मंजुरी दिली. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पट्ट्यातील प्रस्तावित वन्यजीव अनुकूल उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा यात समावेश आहे. हा प्रकल्प अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धतीने विकसित केला जाणार असून, त्याची एकूण लांबी 85.675 किमी आहे, आणि त्यासाठी एकूण 6957 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.