महाकुंभाच्या सांगतेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट

March 02nd, 08:32 pm

प्रयागराज इथे संपन्न झालेल्या महाकुंभ मेळाव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली.हे मंदिर कालातीत वारसा आणि आपल्या संस्कृतीचे धैर्य यांचे दर्शन घडवतेअसे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान, 12 जुलैला देवघर आणि पाटण्याला देणार भेट

July 09th, 09:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जुलै 2022 रोजी दुपारी 1:15 वाजताच्या सुमाराला देवघर आणि पाटण्याला भेट देणार आहेत. देवघरमध्ये 16,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास पंतप्रधान करतील. त्यानंतर दुपारी 2.40 च्या सुमारास बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बाबा बैद्यनाथ मंदिरात ते दर्शन घेतील आणि पूजा करतील. संध्याकाळी 6 च्या सुमारास, पाटणा येथे बिहार विधानसभेच्या शताब्दी समारंभाच्या समारोप समारंभाला पंतप्रधान संबोधित करतील.