पंतप्रधान 21 फेब्रुवारी रोजी एचसीएल-फॉक्सकॉन संयुक्त उपक्रम प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार

February 20th, 06:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5 च्या सुमाराला उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण (वायईडीए) येथे एचसीएल-फॉक्सकॉन संयुक्त उपक्रम प्रकल्प - इंडिया चिप प्रा. लि. च्या भूमिपूजन समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.