जी 20 शिखर परिषद 2025 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 23rd, 09:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर इटालियन प्रजासत्ताकच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. याआधी जून मध्ये कॅनडा मध्ये काननास्किस येथे झालेल्या जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी संवाद साधला होता.जी-20 परिषदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन: सत्र 3
November 23rd, 04:05 pm
तंत्रज्ञान जसे पुढे जात आहे, तसे संधी आणि संसाधने काही मोजक्या हातांत केंद्रित होत आहेत. जगात महत्वपूर्ण तंत्रज्ञानावरुन संघर्ष वाढत आहे. हे मानवतेसाठी चिंतेचे कारण तर आहेच, पण नवोन्मेषाच्या मार्गातही अडथळा आहे. यावर उपाय शोधण्यासाठी आपली विचारसरणीत मूलभूत बदल करावे लागतील."सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य" या विषयावरील जी20 सत्रात पंतप्रधानांचे संबोधन
November 23rd, 04:02 pm
पंतप्रधानांनी आज सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य - महत्त्वपूर्ण खनिजे; सन्मानजनक रोजगार; कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील जी20 शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केले. महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे प्रसार केला जातो, त्यामध्ये मूलभूत बदल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांनी नमूद केले की, असे तंत्रज्ञान 'वित्त-केंद्रित' ऐवजी 'मानव-केंद्रित', 'राष्ट्रीय' ऐवजी 'जागतिक' आणि 'बंदिस्त प्रारुपां' ऐवजी 'मुक्त स्त्रोत' प्रणालीवर आधारित असले पाहिजे. हा दृष्टिकोन भारताच्या तंत्रज्ञान परिसंस्थेत समाविष्ट केला गेला आहे आणि त्याचे महत्त्वपूर्ण फायदे झाले आहेत, मग ते अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा डिजिटल व्यवहार असो, जिथे भारत जागतिक नेता आहे, असे त्यांनी सांगितले.जोहान्सबर्गमध्ये जी 20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांशी भेट
November 23rd, 02:18 pm
भारत आणि दक्षिण आफ्रिका संबंधांचा आधार असलेल्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा देत, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि व्यापार व गुंतवणूक, अन्न सुरक्षा, कौशल्य विकास, खाणकाम, युवा आदानप्रदान आणि लोकांमधील परस्पर संबंध यांसारख्या सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी एआय, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या संभाव्य मार्गांवर चर्चा केली. दक्षिण आफ्रिकेत भारतीय कंपन्यांच्या वाढत्या उपस्थितीचे नेत्यांनी स्वागत केले, विशेषतः पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, नवनिर्मिती, खाणकाम आणि स्टार्टअप क्षेत्रात परस्पर गुंतवणुकीला चालना देण्याचे मान्य केले. दक्षिण आफ्रिकेतून भारतात चित्ते आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी अध्यक्ष रामाफोसा यांचे आभार मानले आणि त्यांना भारताच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले.जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 शिखर परिषदेत पंतप्रधान झाले सहभागी
November 22nd, 09:35 pm
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे आयोजित जी20 नेत्यांच्या शिखर परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. जी20 शिखर परिषदांमधील पंतप्रधानांचा हा बारावा सहभाग होता. पंतप्रधानांनी शिखर संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या दोन्ही सत्रांना संबोधित केले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांचे अतिथ्य आणि शिखर संमेलनाचे यशस्वी आयोजन, यासाठी आभार मानले.जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट
November 21st, 10:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांची आज दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. 2020 मध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत संबंध वाढल्यानंतर गेल्या पाच वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सहकार्य वाढत असल्याबद्दल तसेच सहकार्यात येणाऱ्या विविधतेबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. भारतातील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी भारतासोबत एकजुटता व्यक्त केली. दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईला बळकटी देण्यासाठी दोन्ही नेत्यांनी वचनबद्धता व्यक्त केली.PM Modi arrives in Johannesburg, South Africa to participate in G20 Summit
November 21st, 06:25 pm
PM Modi arrived in Johannesburg, South Africa, a short while ago. The PM will attend the 20th G20 Leaders’ Summit. On the margins of the Summit, he will also hold bilateral meetings with world leaders and will also participate in the India-Brazil-South Africa (IBSA) Leaders’ Meeting.पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार
November 19th, 10:42 pm
पंतप्रधान मोदी 21 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या 20 व्या जी 20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. शिखर परिषदेच्या सत्रांमध्ये, पंतप्रधान जी20 अजेंडातील प्रमुख मुद्द्यांवर भारताची भूमिका मांडतील. शिखर परिषदेच्या पार्श्र्वभूमीवर, ते जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्यासोबतच दक्षिण आफ्रिकेने आयोजित केलेल्या भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका (IBSA) नेत्यांच्या शिखर परिषदेतही सहभागी होतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण
August 28th, 06:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन महासंघाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवादामध्ये पंतप्रधानांचा सहभाग
August 25th, 12:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवादात भाग घेतला.ब्रिक्स-आफ्रिका आउटरिच आणि ब्रिक्स प्लस संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
August 24th, 02:38 pm
आफ्रिकेच्या भूमीवर तुम्हा सर्व स्नेह्यांसमवेत उपस्थित राहून अतिशय आनंद होत आहे.15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी
August 23rd, 08:57 pm
यावेळी नेत्यांनी जागतिक आर्थिक पुनर्प्राप्ती, आफ्रिका आणि ग्लोबल साउथबरोबर भागीदारी याबाबत फलदायी चर्चा केली तसेच ब्रिक्स अजेंड्यासंबंधी आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला.चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांनी देशाला केले संबोधित
August 23rd, 07:36 pm
जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर असा इतिहास घडताना पाहतो, तेव्हा जीवन धन्य होते. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्रजीवनाच्या चिरंजीव चेतना बनतात. हा अविस्मरणीय क्षण आहे. हा अभूतपूर्व क्षण आहे. हा विकसित भारताचा शंखनादाचा क्षण आहे. हा नवीन भारताच्या जयघोषाचा क्षण आहे. अडचणींचा महासागर पार करण्याचा हा क्षण आहे. विजयाच्या चंद्रपथावर मार्गक्रमण करण्याचा हा क्षण आहे. हा क्षण 140 कोटी हृदयांच्या ठोक्याच्या सामर्थ्याचा क्षण आहे. हा भारतातील नव्या ऊर्जेचा, नव्या विश्वासाचा, नव्या चेतनेचा क्षण आहे. भारताच्या उगवत्या भाग्याला आवाहन करण्याचा हा क्षण आहे. अमृतकाळातील पहिल्या यशाचा हा अमृतवर्षाव आहे. आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि तो चंद्रावर साकार केला. आणि आपले वैज्ञानिक सहकारी देखील म्हणाले की भारत आता चंद्रावर पोहचला आहे. आज आपण अवकाशात नवभारताच्या नव्या उड्डाणाचे साक्षीदार झालो आहोत.चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक लॅंडींगचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान इस्रो टीमसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून सहभागी
August 23rd, 06:12 pm
चांद्रयान 3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर होणाऱ्या लॅंडींगच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरनसिंगच्या माध्यमातून इस्रोच्या टीमसोबत सहभागी झाले होते. चांद्रयानच्या यशस्वी लॅंडींगनंतर लगेचच, पंतप्रधानांनी इस्रोच्या टीमशी संवाद साधला आणि या ऐतिहासिक यशासाठी त्यांचे अभिनंदन केले.15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
August 23rd, 03:30 pm
पंधराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे भव्य आयोजन आणि आमच्या आदरातिथ्याबद्दल मी माझे प्रिय मित्र राष्ट्रपति रामाफोसा यांचे पुन्हा एकदा खूप-खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.पंतप्रधानांची दक्षिण आफिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत बैठक
August 23rd, 03:05 pm
या बैठकीत दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांतील द्वीपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि संरक्षण, कृषी, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, संवर्धन आणि लोकांमधील संबंध अशा विविध क्षेत्रातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.PM Modi arrives for the BRICS Summit at Johannesburg, South Africa
August 22nd, 06:08 pm
Prime Minister Narendra Modi arrived at Johannesburg in South Africa. Upon arrival at the Waterkloof Air Force Base, PM Modi was accorded a ceremonious welcome by Deputy President, Paul Mashatile of South Africa. PM Modi’s three-day visit to South Africa entails participation in the 15th BRICS Summit and engagements with leaders of BRICS and invited countries in plurilateral and bilateral settings.दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यासाठी प्रस्थान करण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन
August 22nd, 06:17 am
दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली जोहान्सबर्ग येथे आयोजित 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी दिलेल्या आमंत्रणावरून मी 22-24 ऑगस्ट 2023 या कालावधीत दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकला भेट देत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद
August 03rd, 08:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिण आफ्रिकी प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष माटामला सिरिल रामाफोसा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.List of MoUs signed between India and South Africa during 10th BRICS Summit
July 26th, 11:57 pm