पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट

September 03rd, 08:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वाडेफुल यांची भेट घेतली. भारत आणि जर्मनी या वर्षी धोरणात्मक भागीदारीची 25 वर्षे साजरी करत आहेत. चैतन्यपूर्ण लोकशाही आणि आघाडीच्या अर्थव्यवस्था म्हणून, आम्हाला व्यापार, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शाश्वतता, उत्पादन आणि गतिशीलता या क्षेत्रात परस्पर लाभदायक सहकार्य वाढवण्याची मोठी क्षमता दिसते, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.