पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान भेटीसंदर्भात संयुक्त निवेदन
November 12th, 10:00 am
या भेटीदरम्यान, 11 नोव्हेंबर रोजी महामहीम चौथे ड्रुक ग्याल्पो यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त चांगलिमिथांग येथे आयोजित कार्यक्रमात सन्माननीय पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली
November 11th, 06:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिंपू येथे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. दिल्ली दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल भूतानच्या राजांनी शोक व्यक्त केला.Prime Minister Narendra Modi to pay a State visit to Bhutan
November 09th, 09:59 am
PM Modi will pay a State visit to Bhutan from 11-12 November 2025 to strengthen the ties between the two countries. During the visit, the PM will meet His Majesty Jigme Khesar Namgyel Wangchuck, the King of Bhutan and Bhutanese PM Tshering Tobgay. The PM will also attend the 70th birth anniversary celebrations of His Majesty Jigme Singye Wangchuck, the Fourth King of Bhutan and the Global Peace Prayer Festival.नवी दिल्लीत सोल लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 21st, 11:30 am
भूतानचे पंतप्रधान, माझे बंधू दाशो शेरिंग तोबगे जी, सोल बोर्डाचे अध्यक्ष सुधीर मेहता, उपाध्यक्ष हसमुख अढिया, उद्योग विश्वातील दिग्गज, जे आपल्या जीवनात, आपापल्या क्षेत्रात नेतृत्व देण्यात यशस्वी झाले आहेत, अशा अनेक मान्यवरांना मी येथे पाहात आहे आणि भविष्य ज्यांची प्रतीक्षा करत आहेत, अशा माझ्या युवा सहकाऱ्यांना देखील येथे पाहात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोल (SOUL) लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेच्या पहिल्या पर्वाचे उद्घाटन
February 21st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित येथे स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप (School of Ultimate Leadership - SOUL) कॉन्क्लेव्ह 2025 या परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी परिषदेसाठी आलेल्या सर्व मान्यवर नेत्यांचे तसेच भविष्यातील उदयोन्मुख युवा नेत्यांचेही स्वागत केली. आपल्याला काही कार्यक्रम अतिशय आवडतात, आणि आजचा हा कार्यक्रम अशाच कार्यक्रमांपैकी एक असल्याचे ते म्हणाले. राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत चांगल्या नागरिकांची जडणघडण गरजेची असते, त्याच प्रमाणे प्रत्येक क्षेत्रासाठी उत्कृष्ट नेतृत्वाची जडणघडण होणेही अत्यावश्यक असते असे मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केले. प्रत्येक क्षेत्रासाठी उत्कृष्ट नेतृत्वाची जडणघडण होणे ही आजच्या काळाची गरज असल्याची बाबही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखीत केली. त्यामुळेच स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप सारखा उपक्रम हा विकसीत भारताच्या विकासाच्या वाटचालीतला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले. सोल (SOUL) हे काही या संस्थेचे केवळ संक्षिप्त स्वरुपातील नाव नाही, तर या नावातून प्रतित होणारा आत्मा हा अर्थ, हा खऱ्या अर्थाने भारताच्या सामाजिक जीवनाचाही आत्मा असणार असल्याची बाब पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखीत केली. SOUL या शब्दांत अतिशह सुंदरपणे आध्यात्मिक अनुभवाचे सारही सामावलेली असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी सोल सोबत जोडल्या गेलेल्या सर्व भागधारकांना शुभेच्छा दिल्या. लवकरच गुजरातमधील गिफ्ट सिटी इथे सोलचे एक नवे, विस्तीर्ण प्रांगण - संकुल उभारले जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.पंतप्रधानांनी भूतानचे राजे आणि राणी यांचे केले स्वागत
December 05th, 03:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे भूतानचे महामहिम राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानच्या महाराणी जेसन पेमा वांगचुक यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी भूतानच्या राजांना शुभेच्छा दिल्या आणि मार्च 2024 मधील भेटीदरम्यान भूतानचे सरकार आणि तिथल्या जनतेने केलेल्या प्रेमळ आदरातिथ्याची आठवण करून दिली.भूतानच्या राजांतर्फे पंतप्रधानांना अभिनंदनपर दूरध्वनी
June 05th, 08:05 pm
देशात नुकत्याच पार पडलेल्या 18 व्या लोकसभा निवडणुकीत एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी भूतानचे राजे, महामहीम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली. यावेळी भूतानच्या राजांनी पंतप्रधानांना हार्दिक शुभेच्छा देऊन पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील जनतेला सतत प्रगती आणि समृद्धी लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली.पंतप्रधानांनी भूतानच्या राजांची घेतली भेट
March 22nd, 06:32 pm
भारत-भूतान मधील घनिष्ठ मैत्रीपूर्ण आणि अनोख्या संबंधाबद्दल पंतप्रधान आणि भूतानचे राजे यांनी समाधान व्यक्त केले. उभय देशांमध्ये मैत्री आणि सहकार्याचे दृढ संबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने ड्रुक ग्याल्पो पुरस्काराने दिलेल्या मार्गदर्शक दृष्टीकोनाबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.पंतप्रधान भूतानमध्ये दाखल
March 22nd, 09:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 - 23 मार्च 2024 या कालावधीत भूतानच्या शासकीय दौऱ्यावर असून आज ते पारो येथे दाखल झाले. भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय आदानप्रदान आणि सरकारच्या 'शेजारी प्रथम' धोरणावर भर देणे या अनुषंगाने हा दौरा आहे.पंतप्रधानांचा भूतान दौरा (21 - 22 मार्च 2024)
March 22nd, 08:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21- 22 मार्च 2024 या कालावधीत भूतानचा दौरा करणार आहेत. भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाण आणि सरकारच्या 'शेजारी प्रथम' या धोरणावरील भर या अनुषंगाने हा दौरा आहे.पंतप्रधानांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची घेतली भेट
April 04th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली.