झरिया कोळसा खाणींच्या परिसरातील आग, भूस्खलन या घटना रोखण्यासह बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सुधारित झरिया बृहद आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 25th, 03:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने झरिया कोळसा खाणींच्या परिसरातील आग, भूस्खलन या घटना रोखण्यासह बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सुधारित झरिया बृहद आराखड्याला मंजुरी दिली आहे. सुधारित योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण 5,940.47 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. टप्प्याटप्प्याने राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत प्राध्यान्याने सर्वात असुरक्षित क्षेत्रांमध्ये आग आणि भूस्खलनासारख्या घटना हाताळल्या जातील तसेच बाधित कुटुंबांचे पुनर्वसन केले जाईल.