पंतप्रधानांनी ‘हूल दिवस’ निमित्त आदिवासी वीरांना वाहिली आदरांजली

June 30th, 02:28 pm

‘हूल दिवस’ या आदिवासी वीरांच्या स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या आदिवासी समाजाच्या अदम्य साहस आणि असामान्य पराक्रमाला विनम्र अभिवादन केले. ऐतिहासिक संथाल विद्रोहाच्या स्मरणार्थ पंतप्रधानांनी सिदो-कान्हू, चांद-भैरव, आणि फूलो-झानो यांसारख्या थोर स्वातंत्र्यसैनिकांसह अन्य असंख्य आदिवासी वीर शहीदांना आदरांजली अर्पण केली, ज्यांनी परकीय सत्तेच्या अत्याचाराविरुद्ध आपले बलिदान दिले.