पंतप्रधान 28 मार्च रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर
March 26th, 09:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मार्च 2026 रोजी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ते गौतम बुद्ध नगर, जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल इमारतीला भेट देतील. त्यानंतर, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार असून यानिमित्त होणाऱ्या जाहीर सभेलाही ते संबोधित करतील.उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांमध्ये हायब्रीड ॲन्यूईटी पद्धतीने दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दिल्ली-फरीदाबाद-वल्लभगड-सोहना टोकापासून जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत ग्रीनफिल्ड जोडणी मार्गाच्या उभारणीसाठी खर्चाच्या सुधारित अंदाजाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
March 10th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक कॅबिनेट समितीने आज उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांमध्ये हायब्रीड ॲन्यूईटी पद्धतीने दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दिल्ली-फरीदाबाद-वल्लभगड-सोहना टोकापासून जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत 3630.77 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ग्रीनफिल्ड जोडणी मार्गाच्या उभारणीसाठी खर्चाच्या सुधारित अंदाजाला मंजुरी दिली.