ऑपरेशन सिंदूरवरील विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेले भाषण
July 29th, 05:32 pm
संसदेचे पावसाळी सत्र सुरू होत असताना जेव्हा मी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलत होतो तेव्हा मी सर्व माननीय संसद सदस्यांना आवाहन करताना एका गोष्टीचा उल्लेख केला होता. संसदेचे हे सत्र भारताच्या विजयोत्सवाचे सत्र आहे. संसदेचे हे सत्र भारताचे गौरव गान करण्याचे सत्र आहे.ऑपरेशन सिंदूर संदर्भातील विशेष सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले
July 29th, 05:00 pm
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने राबवलेल्या मजबूत, यशस्वी आणि निर्णायक ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेला संबोधित केले. सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधानांनी या अधिवेशनाचे वर्णन भारताच्या विजयांचा उत्सव आणि भारताच्या गौरवाला आदरांजली असे करावे असे आवाहन संसदेच्या सर्व मान्यवर सदस्यांना केले आहे असे सांगत सत्राच्या सुरुवातीला माध्यमांच्या प्रतिनिधींशी साधलेल्या संवादाचे स्मरण केले.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध
April 24th, 03:29 pm
जम्माू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात, अनेक निरपराध लोकांचा बळी गेला त्या घटनेनंतर सहवेदना व्यक्त करण्यासाठी जागतिक नेत्यांची रीघ लागली होती. साऱ्या जगातून मिळालेल्या या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त करतानाच भारत दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या पाठीराख्यांना पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातून हुडकून काढेल असाही निर्धार व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांचे केले स्वागत
April 21st, 08:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत सेकंड लेडी उषा व्हान्स, त्यांची मुले आणि अमेरिकन प्रशासनाचे वरिष्ठ सदस्य देखील होते.पंतप्रधान मोदींचा फ्रान्स दौरा: धोरणात्मक भागीदारीला बळकटी आणि AI सहकार्यात आघाडी
February 13th, 03:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स आणि युनायटेड स्टेट्सच्या नुकत्याच पार पडलेल्या राजनैतिक दौऱ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आर्थिक सुधारणा आणि ऐतिहासिक संबंधांचा आदर राखणे या मुद्यांना ठळकपणे केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याने त्याचा भारताची जगासोबतची आघाडी अधिक बळकट करण्यावर लक्षणीय प्रभाव पाडला. या सर्वसमावेशक भेटीने AI चा जबाबदार विकास, आर्थिक सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्याप्रती भारताची वचनबद्धता प्रकट झाली.पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींची अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स यांच्याशी चर्चा
February 12th, 12:19 am
पंतप्रधान मोदींची पॅरिस येथे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत भेट