पंतप्रधानांनी जया श्री महा बोधी मंदिराला दिली भेट
April 06th, 11:24 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरात कुमार डिसानायके यांच्या सोबत अनुराधापुरा येथील पवित्र जया श्री महा बोधी मंदिराला भेट दिली आणि महाबोधी वृक्षाजवळ प्रार्थना केली. या वृक्षाची वाढ बो रोपापासून झाल्याचे मानले जाते, जो भारतातून तिसऱ्या शतकात इ.स.पूर्व संगमित्ता महा थेरि यांच्या कडून श्रीलंकेत आणण्यात आला होता.