पंतप्रधानांनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेव्हिअर मिली यांची घेतली भेट
July 06th, 01:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष महामहीम जेव्हिअर मिली यांची भेट घेतली. पंतप्रधान कासा रोझादामध्ये पोहोचले, तेव्हा राष्ट्राध्यक्ष मिली यांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. काल बुएनोस आयर्समध्ये आगमनानंतर पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. ही भेट विशेष महत्त्वाची आहे, कारण 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला झालेली भारतीय पंतप्रधानांची ही पहिली द्विपक्षीय भेट आहे. भारत-अर्जेंटिना संबंधांचे हे एक महत्त्वाचे वर्ष आहे, कारण दोन्ही देश राजनैतिक संबंध स्थापनेच्या 75 वर्षांची पूर्तता साजरी करत आहेत. पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मिली यांचे आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे त्यांनी केलेल्या आतिथ्याबद्दल आभार मानले.पंतप्रधान मोदींचे अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथे आगमन
July 05th, 07:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच अर्जेंटिनामध्ये पोहोचले. ते राष्ट्राध्यक्ष मिलेई यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
July 02nd, 07:34 am
घानाचे राष्ट्रपती जॉन द्रामनी महामा यांच्या आमंत्रणाचा मान राखत मी 2 आणि 3 जुलै रोजी घाना देशाला भेट देईन. जगाच्या दक्षिणेकडील देशांपैकी घाना हा आपला महत्त्वाचा भागीदार देश आहे आणि हा देश आफ्रिकन महासंघ तसेच पश्चिम आफ्रिकी राष्ट्रांचा आर्थिक समुदाय यामध्ये महत्वाची भूमिका निभावतो.उभय देशांमधील ऐतिहासिक बंध आणखी दृढ करण्यासाठी आणि गुंतवणूक, उर्जा, आरोग्य, सुरक्षा, क्षमता निर्मिती तसेच विकासविषयक भागीदारी या क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दालने खुली करण्यासाठी मी उत्सुक आहे. सहकारी लोकशाही देश असलेल्या घानाच्या संसदेत भाषण करणे हा माझा सन्मान असेल असे मी समजतो.पंतप्रधानांचा घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया दौरा (02 - 09 जुलै )
June 27th, 10:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 02-03 जुलै 2025 दरम्यान घानाला भेट देतील. पंतप्रधानांचा घानाचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा असेल. तीन दशकांनंतर भारताचे पंतप्रधान घानाला भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान घानाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करून मजबूत द्विपक्षीय भागीदारीचा आढावा घेतील आणि आर्थिक, ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य आणि विकास सहकार्य भागीदारीद्वारे ती वाढवण्यासाठी अन्य मार्गांवर चर्चा करतील. हा दौरा दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि ECOWAS [पश्चिम आफ्रिकन देशांचा आर्थिक समुदाय] आणि आफ्रिकन संघासोबत भारताचे संबंध मजबूत करण्याप्रति सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल.पंतप्रधानांनी अर्जेंटिनाच्या अध्यक्षांची घेतली भेट
November 20th, 08:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने 19 नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई,यांची भेट घेतली.अर्जेंटिनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल जेवियर माइली यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
November 20th, 05:00 pm
अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल जेवियर माइली यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.