भारत - जपान मानव संसाधन देवाणघेवाण आणि सहकार्य कृती आराखडा
August 29th, 06:54 pm
भारत आणि जपान यांच्या दरम्यान होत असलेल्या व्दिपक्षीय कार्यक्रमामध्ये 5 वर्षात 500,000 कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण होईल. यामध्ये भारतातील 50,000 कुशल कर्मचारी आणि संभाव्य प्रतिभावंतांचा समावेश असणार आहे. भारत-जपान यांच्यामधील 2025 च्या वार्षिक शिखर परिषदेदरम्यान उभय देशांच्या पंतप्रधानांनी भेटी आणि देवाणघेवाणीद्वारे त्यांच्या नागरिकांमध्ये सखोल समज वाढवण्याची, मूल्ये सह-निर्माण करण्याची आणि संबंधित राष्ट्रीय प्राधान्यक्रम लक्षात घेवून कार्य करण्यासाठ, मानवी संसाधनांसाठी सहयोगी मार्ग शोधण्याच्या आवश्यकतेविषयी सहमती दर्शविली.भारत आणि जपानमधील आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कीझाई डोयुकाई या उच्चाधिकार प्रतिनिधीमंडळाशी केली चर्चा
March 27th, 08:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्ग इथल्या आपल्या निवासस्थानी जपान असोसिएशन ऑफ कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह्स (Keizai Doyukai) च्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत आणि जपान दरम्यान आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठीचे त्यांचे विचार आणि सूचना समजून घेतल्या. कीझाई डोयुकाईचे अध्यक्ष ताकेशी निनामी यांच्या नेतृत्वातील या प्रतिनिधिमंडळासोबत जपानमधील 20 उद्योग व्यावसायिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.