पंतप्रधानांच्या सिलवासा येथील विकास कामांच्या उद्घाटनावेळी दिलेल्या भाषणाचा मजकूर
March 07th, 03:00 pm
दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीवचे प्रशासक प्रफुल्लभाई पटेल, संसदेमधील माझ्या सहकारी कलाबेन डेलकर, सर्व मान्यवर, बंधू-भगिनींनो, नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिल्वासा, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे 2580 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण
March 07th, 02:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिल्वासा, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे 2580 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी सिल्वासा येथे नमो रुग्णालयाचे उद्घाटनही केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी त्यांना या प्रदेशाशी जोडण्याची आणि सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील समर्पित कामगारांप्रति कृतज्ञता व्यक्त केली . इथल्या लोकांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे आणि दीर्घकालीन बंध यांचा त्यांनी उल्लेख केला आणि सांगितले की या प्रदेशाशी त्यांचे संबंध अनेक दशके जुने आहेत . 2014 मध्ये त्यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव प्रदेशाने केलेली प्रगती त्यांनी अधोरेखित केली . या प्रदेशांनी त्यांची क्षमता शक्तीमध्ये परिवर्तित करून आधुनिक आणि प्रगतीशील म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.जनऔषधी दिनानिमित्त परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी पंतप्रधानांनी आपली वचनबद्धता पुन्हा केली व्यक्त
March 07th, 12:20 pm
जनऔषधी दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना उच्च दर्जाची, परवडणारी औषधे पुरवण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. यामुळे निरोगी आणि तंदुरुस्त भारत सुनिश्चित केला जाऊ शकेल असे ते म्हणाले.