जमात-उलमा ए हिंद चे नेते पंतप्रधानांना भेटले
May 09th, 06:39 pm
मुस्लीम समुदायाचे 25 नेते, जमात- उलमा ए हिंद च्या छत्राखाली पंतप्रधानांना भेटले. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीची प्रशंसा करून म्हटले की संपूर्ण देशाचा पंतप्रधानांवर विश्वास आहे आणि त्याच विश्वासामुळे समाजातल्या प्रत्येक घटकाच्या प्रगती आणि कल्याणाची आशा वाटते आहे. त्यांनी तीन तलाक च्या बाबतीत पंतप्रधानांच्या भूमिकेला देखील दाद दिली.