केंद्रीय मंत्रीमंडळाची जल जीवन मिशनला (जेजेएम) डिसेंबर 2028 पर्यंत अतिरिक्त खर्चासह मुदतवाढ तसेच जेजेएम 2.0 अंतर्गत ग्रामीण पेयजल पुरवठा क्षेत्रामधील रचनात्मक सुधारणांवर भर देणाऱ्या पुनर्रचित अंमलबजावणीला मान्यता

March 10th, 04:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने आज जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीची पुनर्रचना तसेच सेवा वितरणाच्या दिशेने वळवण्यास मंजूरी दिली. पेयजल प्रशासन व संस्थाप्रणालीच्या पाठिंब्याद्वारे नळाद्वारे शाश्वत ग्रामीण पेयजल पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती ते पुरवठा असे हे अभियान आहे.