Gujarat’s biggest strength is that it has kept development moving continuously for the past 25 years: PM Modi in Vav-Tharad

March 31st, 05:00 pm

PM Modi launched and dedicated multiple development projects in Vav-Tharad, Gujarat, worth nearly ₹20,000 crore. Addressing a large gathering, he highlighted initiatives across roads, railways, power, water supply, urban development, healthcare and tourism aimed at boosting connectivity, improving public services and accelerating socio-economic growth in the region while strengthening the vision of a Viksit Bharat.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या वाव-थराद येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे केले भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण

March 31st, 04:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बनासकांठा जिल्ह्यातील वाव-थराद येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी उत्तर गुजरातसाठी सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले; तसेच काही प्रकल्पांचे भूमिपूजन केले. नवरात्रीचा पवित्र उत्सव नुकताच साजरा झाला असून, आज 'भगवान महावीर जयंती' देखील आहे, याची नोंद घेत पंतप्रधानांनी 'माँ अंबाजी' आणि 'भगवान श्री धरणीधरजी' यांना आदरांजली अर्पण केली.

पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक करत सांगितले, भगवान महावीरांच्या संदेशात अद्भुत प्रेरणा आहे

March 31st, 10:41 am

भगवान महावीरांच्या सत्य, सद्भाव,सदाचरण आणि समानतेवर आधारित संदेशात अद्भुत प्रेरणा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ''त्यांचे महान विचार मानवतेसाठी सदैव मार्गदर्शक राहतील'', असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Samrat Samprati Museum is the heritage of millions of people in India, heritage of India's glorious past: PM Modi in Gandhinagar, Gujarat

March 31st, 10:25 am

PM Modi inaugurated the Samrat Samprati Sangrahalay, Jain Heritage Museum at Koba Tirth in Gandhinagar, Gujarat, on the auspicious occasion of Bhagwan Mahavir Janma Kalyanak. Speaking on the occasion, the PM said the Sangrahalay belongs to the crores of people of India and stands as a testament to our glorious past. Lauding the ahimsa philosophy of Samrat Samprati, he called on people to rise above personal aspirations and work for the nation.

महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथील सम्राट सम्प्रती संग्रहालयाचे उद्घाटन

March 31st, 10:15 am

भगवान महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथील सम्राट सम्प्रती संग्रहालय या जैन वारसा संग्रहालयाचे उद्घाटन झाले. “कोबा तीर्थ आध्यात्मिक शांततेने भरुन गेले आहे, याठिकाणी अनेक जैन मुनींची आणि संतांची तपस्या फळाला आली आणि इथे सर्जनशीलता व सेवाभाव नैसर्गिकरित्या फुलला,” असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान उद्या 31 मार्च रोजी गुजरातला भेट देणार

March 30th, 11:05 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 31 मार्च 2026 रोजी गुजरातला भेट देणार आहेत. या दिवशी सकाळी 10 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगर येथील सम्राट संप्रति वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन होईल. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील. त्यानंतर दुपारी साधारण पाऊण वाजता ते अहमदाबाद मध्ये साणंद येथील कायनेस सेमीकॉन कारखान्याचे उद्घाटन करतील तसेच उपस्थित जनतेला संबोधित देखील करतील. त्यानंतर ते वाव-थराड येथे पोहोचतील आणि तेथे दुपारी चार वाजता ते 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करतील. याप्रसंगी ते उपस्थितांशी संवाद देखील साधतील.

पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये पश्चिम आशियातील संकटावर मात करण्यासाठी 140 कोटी भारतीयांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला.

March 29th, 11:30 am

या महिन्याच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य केले आणि या संकटावर मात करण्यासाठी एकजूट राहण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी नागरिकांना अफवांना बळी न पडण्याचे आणि केवळ सरकारने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी ज्ञान भारतम सर्वेक्षण, खेळ आणि तंदुरुस्ती, जलसंधारण, मत्स्यपालन आणि सौर ऊर्जा अशा प्रमुख विषयांचाही उल्लेख केला.

Yuva Shakti is driving developed India while strengthening cultural roots: PM at release of 500th Book of Shrimad Vijayaratna Sunder Surishwarji Maharaj

January 11th, 01:00 pm

Delivering his remarks during the release of Shrimad Vijayaratna Sunder Surishwarji Maharaj’s 500th book, PM Modi expressed confidence that this creation would benefit society, youth and humanity at large. He remarked that Maharaj’s 500 works are like a vast ocean containing countless gems of thought, offering simple and spiritual solutions to humanity’s problems. The PM also recalled the nine appeals and nine resolutions he had made for the welfare of the society.

श्रीमद् विजयरत्न सुंदर सुरीश्वरजी महाराज यांच्या 500 व्या पुस्तक प्रकाशन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले विचार

January 11th, 12:44 pm

श्रीमद् विजयरत्न सुंदर सुरीश्वरजी महाराज यांच्या 500 व्या पु्स्तक प्रकाशन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपले विचार मांडले. उपस्थितांना संबोधित करताना, मोदी म्हणाले की, या पवित्र प्रसंगी ते सर्वप्रथम पूज्य भुवनभानूसुरीश्वरजी महाराज यांच्या चरणी नमन करत आहेत आणि प्रशांतमूर्ती सुविशाल गच्छाधिपती पूज्य श्रीमद् विजय राजेंद्रसूरीश्वरजी महाराज, पूज्य गच्छाधिपती श्री कल्पतरुसूरीश्वरजी महाराज, सरस्वती कृपापात्र परम पूज्य आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज आणि समारंभात उपस्थित असलेल्या सर्व संत आणि साध्वींना आदरपूर्वक वंदन करत आहेत. त्यांनी ऊर्जा महोत्सव समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्लीत ज्ञान भारतम् वरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

September 12th, 04:54 pm

आज विज्ञान भवन भारताच्या सुवर्ण भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा साक्षीदार बनत आहे. काही दिवसांपूर्वीच, मी ज्ञान भारतम् अभियानाची घोषणा केली होती. आणि आज, इतक्या कमी वेळात, आपण ज्ञान भारतम् आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करत आहोत. त्याचे संकेतस्थळही नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हा काही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नाही; ज्ञान भारतम् अभियान ही भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतनेची घोषणा बनत आहे. हजारो पिढ्यांचे चिंतन, भारताचे महान ऋषीमुनी, आचार्य आणि विद्वानांचे ज्ञान आणि संशोधन, आपली ज्ञान परंपरा, आपला वैज्ञानिक वारसा, हे सर्व आपण ज्ञान भारतम् अभियानाद्वारे डिजिटल स्वरूपात आणणार आहोत. मी या अभियानासाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. मी ज्ञान भारतमच्या संपूर्ण चमूला आणि संस्कृती मंत्रालयालाही शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

September 12th, 04:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ग्यान भारतम या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले.या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज विज्ञान भवन भारताच्या सोनेरी भूतकाळाचे पुनरुत्थान पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ग्यान भारतम मिशनची घोषणा केली होती आणि इतक्या कमी कालावधीत ही ग्यान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या मिशनशी संबंधित पोर्टलचेही उद्घाटन केल्याची मोदी यांनी माहिती दिली. हा कोणताही सरकारी किंवा शैक्षणिक कार्यक्रम नसून, ग्यान भारतम मिशन हे भारताची संस्कृती, साहित्य आणि चेतना यांचा उद्घोष बनेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी हजारो पिढ्यांच्या चिंतनशील परंपरेवर विचार व्यक्त केले. त्यांनी भारताच्या महान ऋषी, आचार्य आणि विद्वानांच्या ज्ञान आणि संशोधनाचा गौरव केला, तसेच भारताची ज्ञान परंपरा आणि वैज्ञानिक वारसा यावर भर दिला. मोदी म्हणाले की, ग्यान भारतम मिशनच्या माध्यमातून हा वारसा डिजिटाइज केला जात आहे. त्यांनी या मिशनसाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आणि संपूर्ण ग्यान भारतम टीम तसेच संस्कृती मंत्रालयाला शुभेच्छा दिल्या.

क्षमा, करुणा आणि नम्रतेचे आवाहन करणाऱ्या संवत्सरीनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा

August 27th, 06:20 pm

संवत्सरीच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या असून क्षमा, करुणा आणि प्रामाणिक मानवी संबंध या कालातीत मूल्यांवर भर दिला आहे.

नवी दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये आयोजित आचार्य श्री विद्यानंद महाराज यांच्या शताब्दी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 28th, 11:15 am

परम श्रध्देय आचार्य प्रज्ञ सागर महाराज जी, श्रवण बेळगोळच्या मठाचे मठाधिपती स्वामी चारूकीर्ती जी, माझे सहकारी गजेंद्रसिंह शेखावत, संसदेतील माझे सहकारी नवीन जैन, भगवान महावीर अहिंसा भारती न्यासाचे अध्यक्ष प्रियंक जैन, सचिव ममता जैन, विश्वस्त पीयूष जैन आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, संतवर्ग, भगिनी आणि सद्गृहस्थ हो, जय जिनेंद्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले

June 28th, 11:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 28 जून 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आचार्य श्री विद्यानंदजी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला संबोधित केले.

पंतप्रधान 28 जून रोजी नवी दिल्ली येथे आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या शताब्दी समारंभाचे करणार उद्घाटन

June 27th, 05:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या शताब्दी समारंभाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांच्या आदर्शांच्या गहन प्रभावाचे पंतप्रधानांनी केले स्मरण

April 10th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांच्या कालातीत शिकवणीचे स्मरण केले आणि त्यांच्या शिकवणीचा आपल्या स्वतःच्या जीवनावर असलेल्या खोल प्रभावाचे स्मरण केले.

महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीर यांना पंतप्रधानांनी केले वंदन

April 10th, 08:44 am

आज महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान महावीर यांना वंदन केले आहे. भगवान महावीर नेहमीच अहिंसा, सत्य आणि करुणेवर भर देत असत आणि त्यांचे आदर्श जगभरातील असंख्य लोकांना बळ देतात, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी सरकारने प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला असून या निर्णयाचे खूप कौतुक झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

नवकार महामंत्र दिवसाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 09th, 08:15 am

मन शांत आहे, मन स्थिर आहे, केवळ शांतता आहे, एक अद्भुत अनुभूती आहे, शब्दांच्या पलीकडे, विचारांच्या पलीकडे, नवकार महामंत्र अजूनही मनात गुंजत आहे. नमो अरिहंताणं॥ नमो सिद्धाणं॥ नमो आयरियाणं॥ नमो उवज्झायाणं॥ नमो लोए सव्वसाहूणं॥ मन स्थिर आहे , केवळ शांतता , एक स्वर, एक प्रवाह, एक ऊर्जा, कुठलाही चढउतार नाही, केवळ स्थिरता, केवळ समभाव . एक विशिष्ट चेतना, एकसमान लय, अंतर्मनात एकसमान प्रकाश. नवकार महामंत्राची ही आध्यात्मिक शक्ती मला अजूनही अंतर्मनात जाणवते. काही वर्षांपूर्वी मी बंगळुरूमध्ये अशाच एका सामूहिक मंत्रोच्चाराला उपस्थित होतो, आज तसाच अनुभव आला आणि तितकाच गहिरा. यावेळी, देशात आणि परदेशात एकाच वेळी एकाच चेतनेशी जोडलेले लाखो-कोट्यवधी पुण्य आत्मे, एकत्र बोललेले शब्द, एकत्र जागृत झालेली ऊर्जा , हे खरोखरच अभूतपूर्व आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवकार महामंत्र दिवसाचे उद्घाटन

April 09th, 07:47 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नवकार महामंत्र दिवसाचे उद्घाटन केले आणि त्यात सहभागी झाले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नवकार मंत्राचा गूढ आध्यात्मिक अनुभव अधोरेखित केला तसेच मनामध्ये शांती आणि स्थैर्य आणण्याच्या त्याच्या क्षमतेवर भर दिला. शब्द आणि विचारांच्या पलीकडे जाणारी, मन आणि चेतनेत खोलवर प्रतिध्वनित होणारी शांतीची असाधारण भावना त्यांनी विशद केली. नवकार मंत्राचे महत्त्व अधोरेखित करताना मोदी यांनी त्यातील काही पवित्र श्लोक ऐकवले आणि हा मंत्र उर्जेचा एकीकृत प्रवाह असल्याचे सांगितले , जो स्थैर्य , समता आणि चेतना आणि आंतरिक प्रकाशाच्या सामंजस्यपूर्ण लयीचे प्रतीक आहे. आपले वैयक्तिक अनुभव कथन करताना , त्यांनी आपल्या अंतर्मनात नवकार मंत्राची आध्यात्मिक शक्ती कशी जाणवत आहे याबद्दल सांगितले. काही वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये अशाच एका सामूहिक जप कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची आठवण त्यांनी सांगितली जिने त्यांच्यावर कायमस्वरूपी ठसा उमटवला. पंतप्रधानांनी देशभरातील आणि परदेशातील लाखो सद्गुणी आत्म्यांचे एकात्मिक चेतनेत एकत्र येणे हा अतुलनीय अनुभव असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सामूहिक ऊर्जा आणि समन्वित शब्दांबाबत बोलताना ते खरोखरच असाधारण आणि अभूतपूर्व असल्याचे नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत 9 एप्रिल रोजी नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमात होणार सहभागी

April 07th, 05:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 एप्रिल रोजी नवी दिल्लीत नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.