पंतप्रधान 4 ऑक्टोबर रोजी 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचे उद्घाटन करणार
October 03rd, 03:54 pm
युवा विकासासाठीचा एक महत्वाचा उपक्रम म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सकाळी 11 वाजता 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचे उद्घाटन करतील. यामुळे देशभरात शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेला निर्णायक चालना मिळेल. या कार्यक्रमात कौशल दीक्षांत समारंभ देखील आयोजित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, आयोजित होत असलेला हा चौथा राष्ट्रीय कौशल्य दीक्षांत समारंभ असेल. यामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील राष्ट्रीय पातळीवर अव्वल कामगिरी करणाऱ्या 46 विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाईल.