पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 31st, 11:30 am
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.गयानामधल्या भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 22nd, 03:02 am
आपणा सर्वांसमवेत इथे उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. आपल्यासमवेत इथे उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रपती इरफान अली यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. इथे दाखल झाल्यापासून मला दिलेला स्नेह आणि आपुलकी यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपती अली यांनी आपल्या निवासस्थानी केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा स्नेह आणि आपुलकी यासाठीही मी आभारी आहे. आदरातिथ्य हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, गेले दोन दिवस मी याचा अनुभव घेत आहे. राष्ट्रपती अली आणि त्यांच्या आजीसमवेत आम्ही वृक्षारोपणही केले. ‘एक पेड मां के नाम’ म्हणजेच आईसाठी वृक्षारोपण या आमच्या उपक्रमाचा हा भाग आहे. हा भावनिक क्षण माझ्या नेहमीच स्मरणात राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील भारतीय समुदायाला केले संबोधित
November 22nd, 03:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित कार्यक्रमात आज तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. गयानाचे राष्ट्रपती डॉ.इरफान आली. पंतप्रधान मार्क फिलिप्स, उपराष्ट्रपती भारत जगदेव, माजी राष्ट्रपती डोनाल्ड रमोतार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी गयानामध्ये आल्यावर विशेष स्नेहासह त्यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी गयानाच्या राष्ट्रपतींचे आभार मानून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय यांनी व्यक्त केलेला स्नेह आणि दयाळूपणा याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.“आदरातिथ्याचे तत्व आपल्या संस्कृतीच्या हृदयस्थानी आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.भारत सरकारने सुरु केलेल्या ‘एक वृक्ष मातेसाठी’या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती आणि त्यांच्या आजी यांच्यासह एक रोपटे लावल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. हा एका अत्यंत भावनिक क्षण होता आणि तो आपल्या कायम स्मरणात राहील असे नोदी पुढे म्हणाले.महाप्रभू जगन्नाथ यांच्या रथयात्रेनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
July 07th, 08:31 am
महाप्रभू जगन्नाथ यांच्या पवित्र रथयात्रेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा शुभेच्छा दिल्या आहेत.बीजेडीचे मामुली नेतेही आता करोडपती झाले आहेत: पंतप्रधान मोदी ढेंकनालमध्ये
May 20th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या ढेंकनाल येथे एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित केल्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभा निवडणुकांच्याही प्रचाराला वेग आला. त्यानंतर पंतप्रधानांनी मोठ्या जनसमुदायाला संबोधित केले आणि म्हणाले, “बीजेडीने ओडिशाला काहीही दिलेले नाही. शेतकरी, तरुण आणि आदिवासी अजूनही जीवनमान अधिक चांगले व्हावे यासाठी झगडत आहेत. ज्या लोकांनी ओडिशाचा नाश केला त्यांना माफ करता कामा नये.पंतप्रधान मोदींचे ओडिशामधील ढेंकनाल आणि कटक येथील भव्य प्रचार सभांमध्ये भाषण
May 20th, 09:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या ढेंकनाल येथे एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित केल्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभा निवडणुकांच्याही प्रचाराला वेग आला. त्यानंतर पंतप्रधानांनी मोठ्या जनसमुदायाला संबोधित केले आणि म्हणाले, “बीजेडीने ओडिशाला काहीही दिलेले नाही. शेतकरी, तरुण आणि आदिवासी अजूनही जीवनमान अधिक चांगले व्हावे यासाठी झगडत आहेत. ज्या लोकांनी ओडिशाचा नाश केला त्यांना माफ करता कामा नये.In Odisha, the state BJP is committed to promoting the Odia language and culture: PM Modi in Kandhamal
May 11th, 10:40 am
Kandhamal, Odisha, witnessed a grand celebration with the arrival of Prime Minister Narendra Modi. Affectionately addressing the audience ahead of Lok Sabha as well as assembly elections in the state, the PM expressed immense pride in the state of Odisha and its invaluable contribution to the nation.PM Modi delivers stirring addresses to mammoth gatherings in Kandhamal, Balangir & Bargarh, Odisha
May 11th, 10:30 am
Kandhamal, Balangir & Bargarh, Odisha, witnessed grand celebrations with the arrival of Prime Minister Narendra Modi. Affectionately addressing the audience ahead of Lok Sabha as well as assembly elections in the state, the PM expressed immense pride in the state of Odisha and its invaluable contribution to the nation.पंतप्रधानांनी रथ यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या
June 20th, 08:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रथ यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.PM Narendra Modi visits Jagannath Temple in Puri, Odisha
February 07th, 01:31 pm