पूज्य जगद्गुरू शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्या निधनावर पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

February 28th, 11:16 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूज्य जगद्गुरू शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, “श्री कांची कामकोटी पिठाचे आचार्य पूज्य जगद्गुरू श्री जयेंद्र सरस्वती शंकराचार्य यांच्या निधनामुळे अतीव दुःख झाले आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि उदात्त विचारांमुळे ते भक्तांच्या मनात ते कायम राहतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो”.