इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
October 24th, 10:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) स्थापना दिनानिमित्त सर्व हिमवीरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. या दलाने राष्ट्रासाठी दिलेल्या उत्कृष्ट सेवेचाही त्यांनी गौरव केला असून, या दलाचे शौर्य, शिस्तबद्धता आणि कर्तव्याप्रती असलेल्या दृढ बांधिलकीचे त्यांनी कौतुक केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत आणि बचाव मोहिमांदरम्यानची या दलाची करुणा वृत्ती आणि तत्परतेचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली असून, यात या दलाच्या सेवा आणि मानवतेच्या उत्कृष्ट परंपरांचे प्रतिबिंब उमटल्याचे दिसते असे त्यांनी म्हटले आहे.भारत तिबेट सीमा पोलीस दल अर्थात आयटीबीपीच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून आयटीबीपी हिमवीरांना शुभेच्छा
October 24th, 10:41 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत तिबेट सीमा पोलीसदलाच्या स्थापनादिनानिमित्त आयटीबीपी हिमवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत-तिबेट सीमा पोलीस दल हे शौर्य आणि समर्पणाचं प्रतिक असल्याचे सांगत नैसर्गिक आपत्ती आणि बचावकार्यात या पोलीस दलाने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. त्यांचं हे कार्य लोकांसाठी अभिमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.