पहिल्या मतदानापासून ते स्टार्टअप इंडियापर्यंत, मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी केली भारतातील तरुणांचे कौतुक

January 25th, 11:30 am

राष्ट्रीय मतदार दिनी प्रसारित झालेल्या या वर्षीच्या पहिल्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाचे कौतुक केले. त्यांनी स्टार्टअप्स, जलसंवर्धन, गुणवत्ता, संस्कृती आणि उत्सव आणि स्वच्छता यासारख्या प्रमुख विषयांवरही प्रकाश टाकला. पुढील महिन्यात होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जगभरातील तज्ञ सहभागी होणार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

Prime Minister interacts with traders and entrepreneurs in Itanagar

September 22nd, 03:43 pm

PM Modi had an interaction with the traders and entrepreneurs in Itanagar, Arunachal Pradesh. Stating that they expressed their appreciation for the GST reforms and the launch of the GST Bachat Utsav, the PM highlighted how these initiatives will benefit key sectors. He emphasised quality standards and encouraged buying Made in India products.

इटानगरमधील स्थानिक व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांची पंतप्रधानांनी घेतली भेट

September 22nd, 03:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटानगर इथे स्थानिक व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांची भेट घेतली. या भेटीत व्यापाऱी आणि विक्रेत्यांनी आपली विविध प्रकारची, विविधरंगी उत्पादने दाखविली. “जीएसटी सुधारणांबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. मी त्यांना ‘गर्व से कहो ये स्वदेशी है’ असे लिहीलेले फलकही दिले. हे फलक आम्ही आमच्या दुकानात लावू असे त्यांनी उत्साहाने सांगितले,” असे मोदी म्हणाले.

अरुणाचल प्रदेशात इटानगर इथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 22nd, 11:36 am

हेलिपॅडवरुन इथं मैदानापर्यंत येणे, वाटेत इतक्या सगळ्या लोकांना भेटणे, लहान-लहान मुला-मुलींच्या हातात असलेला तिरंगा; अरुणाचलमधल्या या स्वागताने माझे ह्रदय आनंदाने, अभिमानाने भरुन आले आहे! आणि हे स्वागत इतके भव्य होते की मला इथे पोहोचायला उशीर झाला. उशीरा आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. अरुणाचलची ही भूमी सुर्योदयाची धरती आहेच; देशभक्तीच्या लाटेचीही धरती आहे. तिरंग्यावरचा पहिला रंग जसा केशरी आहे; तसाच अरुणाचलचा पहिला रंगदेखील केशरी आहे. इथला प्रत्येक माणूस शौर्याचे प्रतीक आहे, साधेपणाचे प्रतीक आहे. मी अरुणाचलमध्ये बरेच वेळा आलो आहे. राजकारणात सत्तेच्या प्रवाहात नव्हतो, तेव्हाही इथे आलो आहे; म्हणूनच इथल्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्या आठवून मलाही आनंद होतो. तुमच्या सगळ्यांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी एक आठवण असते. तुमचं इतकं प्रेम मला लाभलं; जीवनात यासारखं कोणतंही मोठं सुख नाही असे मी मानतो. तवांग मठ ते नमसाईतल्या सुवर्ण पगोडापर्यंतची ही अरुणाचलची भूमी शांती आणि संस्कृती यांचा संगम आहे. भारत मातेचा अभिमान आहे, या पुण्यभूमीला माझा सश्रद्ध नमस्कार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

September 22nd, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी डोनयी पोलो यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचे सर्वांना आशीर्वाद मिळावेत, अशी प्रार्थना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 सप्टेंबर रोजी अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा येथे भेट देणार

September 21st, 09:54 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 सप्टेंबर रोजी अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा येथे भेट देणार आहेत. यावेळी ते इटानगर येथे 5,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. त्यानंतर ते जाहीर सभेला संबोधित करतील.

गुवाहाटी येथे विविध प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 04th, 12:00 pm

आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया जी, मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, रामेश्वर तेली जी, आसाम सरकारचे मंत्री, खासदार आणि आमदार, विविध परिषदांचे प्रमुख आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधानांनी आसाम मधील गुवाहाटी येथे 11,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

February 04th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील गुवाहाटी येथे 11,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. गुवाहाटीमधील मुख्य लक्षीत क्षेत्रांमध्ये क्रीडा आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा तसेच संपर्क सुविधेला चालना देणारे प्रकल्प समाविष्ट आहेत.

पंतप्रधानांनी सामायिक केली त्यांच्या नुकत्याच झालेल्या विमानतळाशी संबंधित कार्यक्रमांची छायाचित्रे

April 12th, 07:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या विमानतळाशी संबंधित कार्यक्रमाची छायाचित्रे सामायिक केली आहे.

तंत्रज्ञान जीवनावर सकारात्मक परिणाम करण्याबरोबरच नागरिकांचे सक्षमीकरणही करत आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

March 06th, 09:07 pm

तंत्रज्ञानामुळे जीवनावर सकारात्मक परिणाम होत आहे आणि त्याचबरोबर नागरिकांचे सक्षमीकरणही होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यसभा खासदार नबाम रेबिया यांच्या ट्विटला ते उत्तर देत होते. डिजिटल इंडिया मोहीम सुरू होण्यापूर्वी अरुणाचल प्रदेशातील शेरगावात फक्त 1 मोबाईल सेवा प्रदाता होता आणि आता येथे 3 मोबाईल सेवा पुरवठादार आहेत अशी माहिती रेबिया यांनी त्यांच्या ट्विटमध्ये दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबरला अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर

November 17th, 03:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशला भेट देतील. पंतप्रधान, सकाळी सुमारे 9:30 वाजता, इटानगर इथल्या डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटन करतील आणि 600 मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केन्द्र राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पोहोचतील, तेथे दुपारी 2 वाजता ते ‘काशी तमिळ संगमम्’चे उद्‌घाटन करतील.

Arunachal Pradesh is India's pride: PM Narendra Modi in Itanagar

February 09th, 12:21 pm

Launching multiple development initiatives in Arunachal Pradesh, PM Modi said, “Arunachal Pradesh is India's pride. It is India's gateway and I assure the people of the region that the NDA Government will not only ensure its safety and security but also fast-track development in the region.” Stating ‘Sabka Saath, Sabka Vikas’ to be the Government’s guiding mantra, PM Modi said that in the last four and half years, no stone was left unturned for development of the Northeast region.

PM visits Itanagar, Says New India can be built only when North East is developed

February 09th, 12:16 pm

Launching multiple development initiatives in Arunachal Pradesh, PM Modi said, “Arunachal Pradesh is India's pride. It is India's gateway and I assure the people of the region that the NDA Government will not only ensure its safety and security but also fast-track development in the region.” Stating ‘Sabka Saath, Sabka Vikas’ to be the Government’s guiding mantra, PM Modi said that in the last four and half years, no stone was left unturned for development of the Northeast region

पंतप्रधान उद्या गुवाहाटी, इटानगर आणि आगरतला दौऱ्यावर

February 08th, 11:51 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुवाहाटी, इटानगर आणि आगरतला दौऱ्यावर जाणार आहेत. इटानगर येथे ग्रीन फिल्ड विमानतळ, सेला बोगदा आणि ईशान्य गॅस ग्रीडची ते पायाभरणी करतील. डीडी अरुण प्रभा वाहिनी आणि गार्जी-बेलोनिया रेल्वेमार्गाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या तीन राज्यात अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ ते करतील.

अरूणाचल प्रदेशमध्ये इटानगर येथे विविध विकास प्रकल्पांच्या देशार्पण प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

February 15th, 12:38 pm

जेव्हा भारताला उगवता सूर्य पाहायचा असतो तेव्हा संपूर्ण भारताला आधी अरुणाचलकडे पाहावे लागते. आमच्या संपूर्ण देशाला, सव्वाशे कोटी देशवासियांना सूर्योदय पाहायचा असेल तर अरुणाचलकडे दृष्टीक्षेप न टाकता सूर्योदय पाहताच येणार नाही. आणि ज्या अरुणाचलमधून अंधाराचे जाळे फिटत जाते, प्रकाश पसरत जातो, येत्या काही दिवसात येथेही विकासाचा इतका प्रकाश पसरेल, जो अवघ्या भारतालाही प्रकाशमान करेल.

पंतप्रधानांनी दिली अरुणाचल प्रदेशला भेट, इटानगर येथे संमेलन केंद्राचे उद्‌घाटन

February 15th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशला भेट दिली. इटानगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी दोरजी खंडू राज्य संमेलन केंद्राचे उद्‌घाटन केले. या केंद्रात प्रेक्षागृह, सभागृह आणि प्रदर्शन गृह आहे.

पंतप्रधान उद्या अरुणाचल प्रदेशला भेट देणार

February 14th, 06:52 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्याअरुणाचल प्रदेशला भेट देणार आहेत. इटानगर इथे होणाऱ्या कार्यक्रमात ते दोरजी खांडू राज्य संमेलन केंद्राचे उदघाटन करणार आहेत. या केंद्रात प्रेक्षागृह , सभागृहआणि प्रदर्शनगृहअसेल. हे केंद्र इटानगरची मोठी ओळख ठरेल अशी अपेक्षा आहे.